आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. (Hair Care Tips) केस चांगले असतील तर आत्मविश्वासही वाढतो. केस सतत गळत असतील तर यावर नवीन उपाय शोधायला हवेत. अनेकदा काही घरगुती उपाय केल्याने केसांच्या वाढीवर चांगला परिणाम झालेला दिसून येतो. (Effective Home Remedies For Long Hairs) घरगुती उपाय केसांच्या चांगल्या वाढीसाठी उत्तम ठरतात. केसांची लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात हा उपाय करण्यासाठी तीळ आणि मेथीच्या तेलाचा वापर करा. (Hair Care Tips)
केस वाढवण्यासाठी तीळ आणि मेथीचे तेल
समान प्रमाणात तिळाचे तेल आणि मेथीचे दाणे घेऊन शिजवून घ्या. नंतर हे तेल जवळपास ५ मिनिटं शिजवा नंतर गॅस बंद करा. तेल थंड करण्यासाठी ठेवा. या तेलाने केसांची चांगली मसाज करा. केस धुण्याच्या १ तास आधी हे तेल व्यवस्थित गरम करा त्यानंतर थंड करून केसांच्या मुळांना लावा. रात्रभर हे तेल केसांना लावून ठेवू शकता. आठवड्यातून २ ते ३ वेळा तीळ आणि मेथीचे तेल केसांवर लावल्याने चांगला परिणाम दिसून येईल. तीळाचे तेल आणि मेथी केसांना लांब, दाट बनवण्यास मदत करते.
तिळाच्या तेलात एंटी ऑक्सिडेंट्स, ओमेगा फॅटी एसिड्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि प्रोटीन असते. या तेलात अमिनो एसिड्स, व्हिटामीन बी, ई आणि व्हिटामीन के असते. आयुर्वेदीक औषधांच्या स्वरूपात तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलाच्या वापराने सेल डॅमेज कमी होते, केस गळणं थांबते, केस वाढण्यास मदत होते, स्काल्पला डायड्रेशन मिळते. सूर्याच्या हानीकारक किरणांपासून संरक्षण होते. कोंड्याचा त्रास कमी होतो.
अंगात रक्त कमी झालंय? जेवताना १ चमचा 'ही' चटणी खा, हिमोग्लोबीन वाढेल-पोटही साफ होईल
मेथीचे दाणे केसांना अनेक फायदे देतात. मेथीचे दाणे औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे केसांची लांबी वाढण्यास मदत होते. या बीया प्रोटीन आणि आयर्नने परिपूर्ण असतात. यात अमिनो एसिड्स असतात जे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे केसांवर लावू शकता. ज्यामुळे केस वेळेआधी पांढरे होत नाहीत. कोंडा कमी करण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात आणि जास्त तेलकट स्काल्पमधून जास्तीचे तेल काढून घेतले जाते.