डोक्यावर पांढरे केस दिसणे म्हणजे म्हातारपण सुरू झाले असे समजले, पण सध्याच्या काळातील व्यस्त जीवनशैली आणि अयोग्य आहाराच्या सवयींमुळे आता तरूणांचे केस 25 वर्षांनी देखील पिकण्यास सुरवात होते, (Grey hairs problem) काही प्रकरणांमध्ये त्यास अनुवांशिक कारणे असू शकतात. (Hair Cae Tips) केस पांढरे झाल्यामुळे तरुणांना लाजिरवाणे आणि कमी आत्मविश्वासाचा सामना करावा लागतो. (Jaggery and fenugreek combination for premature white hair problem solution black methi gud)
केमिकलयुक्त केसांचा रंग वापरला तर केस कोरडे किंवा अनैसर्गिक दिसू लागतात. फायदा होण्याऐवजी नुकसान होते. अशा स्थितीत तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. (Effective Home Remedies for White Hair) आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गूळ आणि मेथीचे दाणे नियमित सेवन केल्यास पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतात.
गुळ आणि मेथीचे दाणे काळ्या केसांसाठी फायदेशीर (Jaggery and fenugreek combination for premature white hair)
-मेथीचे दाणे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, पण जर ते गुळासोबत खाल्ले तर त्याचा प्रभाव दुपटीने वाढतो.
-मेथीचे दाणे बारीक करून पावडर बनवा आणि रोज सकाळी उठून गुळासोबत सेवन करा.
- ही क्रिया काही दिवस केल्यास केस अकाली पांढरे होणे तर थांबेलच पण पांढरे केसही पुन्हा काळे होतील.
मेथीच्या दाण्यांचा या प्रकारे वापर
मेथीदाणे आणि गूळ खाल्ल्याने केसगळतीपासून सुटका मिळते आणि केस पूर्वीपेक्षा मजबूत आणि चमकदार होतात. मेथीचा प्रभाव उष्ण असल्याने अशा स्थितीत उन्हाळ्यात नुकसान टाळण्यासाठी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यावे.
मेथीचे पाणी तयार करण्यासाठी त्याचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उकळून प्या. मेथीचे दाणे केसांना लावून धुतल्यास त्याचाही खूप फायदा होतो. मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवा आणि नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूनं स्वच्छ धुवा.