Join us  

कमी वयात केस पिकलेत? मग डायची झंझट कशाला, २ घरगुती उपाय, केस करा कायमचे काळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 11:43 PM

Effective Home Remedies For White Hair : मेथी हिरवी असो वा दाणेदार, दोन्ही केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस नैसर्गिकरित्या काळे आणि चमकदार बनवतात.

आपले केस नेहमी काळे, दाट असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यासाठी महिला वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण कधीकधी  केस जास्त कमकुवत आणि खराब दिसतात. वेळोवेळी केसांची काळजी न घेतल्यास अशी समस्या उद्भवते.  यामुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होते. (White Hairs Solution) याशिवाय  केसांची वाढही कमी व्हायला लागते. (Effective Home Remedies For White Hair) तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर काही घरगुती तुमचं काम सोपं करू शकतात. म्हणजेच पिकलेले केस काळे करण्यासाठी नेहमीच डाय लावण्याची काही गरज नाही. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले काही पदार्थ केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Home Remedies for Gray Hair)

केसांवर लावा मेथी

मेथी हिरवी असो वा दाणेदार, दोन्ही केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस नैसर्गिकरित्या काळे आणि चमकदार बनतात. सर्व प्रथम एका भांड्यात मेहेंदी पावडर आणि इंडिगो पावडर मिसळा आणि पाण्यात भिजवा. यानंतर मेथीची पावडर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. नंतर मेथीमध्ये मेहेंदी पावडर आणि इंडिगो पेस्ट घालून चांगले मिसळा. यानंतर त्यात खोबरेल तेल घाला. आता 2 तासांसाठी तसंच राहू द्या.  मेथी हेअर कलर मास्क तयार आहे. ब्रशच्या मदतीने ते टाळूवर लावा आणि केस नैसर्गिकरित्या काळे करा.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल आणि आवळा केसांना नैसर्गिक शाइन मिळण्यासाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये असलेले फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ई केस नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच तुम्ही ते देखील वापरू शकता. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी, प्रथम एक वाडगा घ्या. त्यात आवळा तेल आणि ऑलिव्ह तेल घाला. दोन्ही मिक्स करा आणि केसांच्या टाळूवर चांगले लावा. केसांना लावल्यानंतर ३० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा. 

कांदा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कांदा पांढरे केस काळे करण्यासाठी उपयुक्त ठरतो. यासाठी कांदा चांगला बारीक करून रस तयार करा. आता कांद्याचा रस केसांना लावा यानंतर केसांना मसाज करा. केस कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी