उन्हामुळे त्वचेचं खूपच नुकसान होतं. तुम्ही चेहऱ्यावर सनस्क्रीन किंवा इतर प्रोटेक्टिव्ह क्रिम्स वापरत असाल तरीही थोड्या फार प्रमाणात चेहरा काळा पडतो तर कधी मान काळीकुट्ट होतं. (Skin Tanning Problem) अशावेळी पार्लर ट्रिटमेंट्सचाही फारसा उपयोग दिसत नाही. चेहऱ्यावर डी टॅन पॅकचा वापर केल्यास पार्लरसारखा ग्लो मिळवणं अधिक सोपं होऊ शकतं. पार्लरला डी टॅन करायचं म्हटलं की ५०० ते १००० रूपये असेच जातात. घरच्यासाठी कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही डि-टॅन पॅक बनवू शकता. (Most Effective Sun Tan Removal Home Remedy)
घरच्याघरी डि टॅन पॅक कसा तयार करायचा? (How to make d-tan Pack at home)
1) सगळ्यात आधी एका वाटीत २ चमचे तांदूळ, २ चमचे मसूर डाळ १ तासासाठी भिजवून ठेवा. नंतर भिजवलेल्या साहित्याची पेस्ट करून घ्या. या मिश्रणात १ चमचा कॉफी, १ चमचा दही घालून मिसळून घ्या. हे मिश्रण तुम्ही फेसपॅक म्हणून चेहऱ्यावर वापरू शकता. याशिवाय मान, कोपर, दंड शरीच्या कोणत्याही भागावर टॅनिंग असल्यास या पॅकनं मसाज करा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे तुम्हाला चांगला परीणाम दिसून येईल.
2) टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आणि मधाचं मिश्रण लावू शकता. हे दोन्ही घटक त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. लिंबातील ब्लिचिंग गुण त्वचेला ताजेतवानं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. १ टेबलस्पून लिंबात १ चमचा मध घालून चेहऱ्यावर ३० मिनिटांसाठी लावा नंतर चेहरा स्वच्छ धुवा यामुळे चेहऱ्याचा काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल.
दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा
3) एका वाटीत मॅश केलेली पपई घ्या. त्यात मध घालून एकत्र करा आणि चेहरा आणि गळ्याला लावा. २० मिनिटांसाठी चेहरा असाच ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे टॅनिंग निघून काळपटपणा दूर होण्यास मदत होईल. जर तुमच्या चेहऱ्यावर सनबर्न होत असेल तर तुम्ही एलोवेरा जेल लिंबाच्या रसात मिसळून चेहऱ्यावर 10-15 मिनिटे ठेवल्यास काही दिवसात ही समस्या सहज दूर होऊ शकते.
4) ओट्स एका भांड्यात घ्या आणि त्यात लस्सी घालून पेस्ट बनवा आणि चांगले मिसळा. हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. यामुळे चेहरा एक्सफोलिएट होईल आणि चेहऱ्याला आतून ओलावा मिळेल.