Join us  

काखेतला काळपटपणा जाईल -‘अशी’ वापरा चमचाभर ही पांढरी पावडर, काही दिवसात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 10:00 AM

Effective home remedies to lighten dark underarms - use baking soda for this : काखेतला काळेपणा घालवण्यासाठी १ असरदार उपाय..

गडद अंडरआर्म्समुळे (Black underarms) काही महिलावर्ग स्लिव्जलेस घालणं टाळतात. काखेतला काळेपणा वाढला की, आपण हातांची हालचालही करणं टाळतो (Beauty Tips). चारचौघात आपल्याला लाजिरवाणे वाटते. शिवाय आवडीचे कपडेही घालणं टाळतो. काखेतला काळेपणा वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात.

उदाहरणार्थ, हार्मोनल बदल, ब्लेडने शेव्हिंग करणे आणि जास्त धूम्रपान केल्यामुळे अंडरआर्म्सची त्वचा काळपट पडू शकते. बऱ्याचदा काखेतून दुर्गंधीही येते. अशावेळी आपण केमिकल उत्पादनांचा वापर करतो. पण यामुळे काखेतला काळेपणा आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण होते(Effective home remedies to lighten dark underarms - use baking soda for this).

काखेतला काळेपणा प्रॉडक्ट्स वापरूनही निघत नसेल तर, आपण घरगुती उपायही करून पाहू शकता. यासाठी बेकिंग सोड्याचा वापर आपण करू शकता. बेकिंग सोड्याच्या वापराने अगदी काही दिवसात काखेतला काळेपणा दूर होईल. यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. नैसर्गिक पद्धतीने काखेतला काळेपणा दूर होईल.

काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी लागणारं साहित्य

बेकिंग सोडा

पॅरालिसिस झालेल्या नवऱ्याची ‘तिने’ सहा महिने सेवा केली, बरं होताच त्यानं केलं दुसरं लग्न

कॉफी पावडर

टूथपेस्ट

टोमॅटोचा रस

लिंबाचा रस

- एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा घ्या. त्यात १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा टूथपेस्ट, १ चमचा टोमॅटोचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस घालून चमच्याने साहित्य मिक्स करा.

घटस्फोटानंतरही ‘फक्त मुलांसाठी’ कायम प्रेमानं एकत्र येणारे सेलिब्रिटी आईबाबा, मोडलेल्या संसाराची ‘अशी’ही गोष्ट

- तयार पेस्ट लावण्यापूर्वी अंडरआर्म्स स्वच्छ पुसून घ्या. नंतर तयार पेस्ट काखेत लावा. ५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर स्क्रब करा, आणि शेवटी पाण्याने धुवून घ्या. अशा पद्धतीने आपण काखेतला काळेपणा दूर करू शकता.

- आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यातील साहित्यामुळे अगदी काही दिवसात काखेतला काळेपणा दूर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी