Join us  

डार्क सर्कल घालवण्यासाठी आलीया भट करते १ सोपा उपाय; बटाट्याच्या वापरानेही होतो चेहरा क्लिन; पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 10:00 AM

Effective ways to use potato for Dark circle removal : डार्क सर्कल काही केल्या कमी होत नसेल तर; बटाट्याचा सोपा उपाय करून पाहा

अभिनेत्री असो किंवा सामान्य व्यक्ती (Beauty Tips). डार्क सर्कलची (Dark Circle) समस्या सर्वांनाच सतावते. डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याची शोभा काही अंशी कमी होते (Skin Care Tips). जे मेकअप करूनही झाकले जात नाही. डार्क सर्कल येण्यामागे अनेक कारणं आहेत. हे डार्क सर्कल सहसा लवकर जात नाहीत. जे काढण्यासाठी आपण बरेच ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो. पण त्यात केमिकल रसायन असल्यामुळे डोळ्यांनाही इजा होऊ शकते.

जर आपल्याला डोळ्यांखालचे डार्क सर्कल कमी करायचं असेल, तर अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सांगितलेला नुस्खा फॉलो करून पाहा. यामुळे डार्क सर्कल कमी होतील. शिवाय चेहऱ्यावर नवीन तेजही येईल(Effective ways to use potato for Dark circle removal).

आई मंदिरात भीक मागत असे, वडील बूटबॉलिश करत मात्र लेक झाली डॉक्टर-वाचा तिच्या जिद्दीची गोष्ट

डार्क सर्कल काढण्यासाठी आलिया भट्ट कोणता नुस्खा फॉलो करते?

डार्क सर्कल घालवण्यासाठी बर्फाचं पाणी

- डार्क सर्कल घालवण्यासाठी आलिया भट्ट बर्फाच्या पाण्याचा वापर करते. यासाठी ती एका बाऊलमध्ये बर्फ आणि थंड पाणी घेते. त्यात तू १५ - २० सेकंदासाठी चेहरा बुडवून ठेवते, आणि नंतर बाहेर काढते. असं ती २- ३ वेळा करते. जेणेकरून चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन योग्यरीत्या होते आणि डोळ्यांखालील पफीनेसही दूर होतो.

गरबा - दांडिया खेळताना घामाने मेकअप पूर्ण जातो? लक्षात ठेवा १ टीप; मेकअप टिकेल रात्रभर

बटाट्याचा करा असा वापर

- डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण बटाट्याचाही वापर करू शकता. यासाठी सर्वात आधी बटाट्याची साल काढा. नंतर त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्स्युल घालून मिक्स करा.

तयार मिश्रण एका हवाबंद डब्यात घालून ठेवा. तयार पेस्ट ८ - १० दिवस आरामात टिकते. रोज रात्री तयार पेस्ट डोळ्यांखाली लावायचे, नंतर दुसऱ्या दिवशी चेहरा धुवून स्वच्छ करायचा आहे. ७ - १० दिवसात डोळ्यांखालील डार्क सर्कल गायब होईल. 

टॅग्स :आलिया भटब्यूटी टिप्सत्वचेची काळजी