Lokmat Sakhi >Beauty > फक्त १ कच्चा बटाटा चेहऱ्याला लावा, काळे डाग, पिगमेंटेशन होईल कमी! बघा योग्य पद्धत

फक्त १ कच्चा बटाटा चेहऱ्याला लावा, काळे डाग, पिगमेंटेशन होईल कमी! बघा योग्य पद्धत

Effective ways to use potato for skin problems कच्चा बटाटा चेहऱ्यावर जादू करु शकतो, पाहा कसा लावायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 05:24 PM2023-08-25T17:24:27+5:302023-08-25T17:25:13+5:30

Effective ways to use potato for skin problems कच्चा बटाटा चेहऱ्यावर जादू करु शकतो, पाहा कसा लावायचा?

Effective ways to use potato for skin problems | फक्त १ कच्चा बटाटा चेहऱ्याला लावा, काळे डाग, पिगमेंटेशन होईल कमी! बघा योग्य पद्धत

फक्त १ कच्चा बटाटा चेहऱ्याला लावा, काळे डाग, पिगमेंटेशन होईल कमी! बघा योग्य पद्धत

स्वयंपाकघरातील पाककृतींसाठी बटाटा सर्वसमावेशक मानला जातो. भाजी, आमटी, भजी. किंवा पराठा. प्रत्येक गोष्टीत बटाटा वापरण्यात येतो. पण आपण कधी कच्च्या बटाट्याचा वापर स्किनसाठी करून पाहिलं आहे का? बदलत्या लाईफस्टाईलमुळे स्वतःच्या स्किनकडे लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. धूळ, माती, प्रदूषण या कारणांमुळे स्किन खराब होते. यासह कमी वयातच चेहरा वयस्कर दिसू लागतो.

टॅनिंग, सुरकुत्या, फाइन लाईन्स, मुरुम यासह अनेक त्वचेच्या संबंधित समस्या वाढत जातात. यावर उपाय म्हणून केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा एक कच्चा बटाट्याचा वापर करून पाहा. बटाट्याच्या रसामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. कच्चा बटाट्याचा वापर चेहऱ्यासाठी कसा करावा पाहूयात(Effective ways to use potato for skin problems).

बटाट्याचा फेसपॅक

बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात. यासह जर आपण टॅनिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर, बटाट्याचा वापर करून डागरहित त्वचा मिळवा. यासाठी बटाट्याची साल काढून त्याचा किस तयार करा. बटाट्याचा तयार रस एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यात लिंबाचा रस, दूध, बेसन मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा, २० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.

तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्वचा ऑईली होते का? नक्की कोणते स्किनकेअर रुटीन फॉलो करावे? काय खावे?

बटाट्याचा फेसस्क्रब

डेड स्किन काढण्यासाठी आपण बटाट्याच्या रसाचा वापर करून पाहू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये बटाट्याचा रस, एक चमचा दूध, एक चमचा ओट्स घालून मिक्स करा. हे तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने थोडा वेळ मसाज करा. १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा.

रात्री झोपण्यापूर्वी लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक - सकाळी चेहरा बघून म्हणाल..

चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस

काळपट डाग, पिगमेंटेशन, टॅनिंगची समस्या कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करून पाहा. यासाठी सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बटाट्याचा तयार रस थेट चेहऱ्यावर लावा. १० मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवा. बटाट्याचा रस त्वचेवर लावल्याने टॅनिंग, काळे डाग, बारीक रेषा, सुरकुत्या कमी होतात. बटाट्याचा रस आठवड्यातून २ ते ३ वेळा लावल्यास याचा फायदा होईल.

Web Title: Effective ways to use potato for skin problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.