हिवाळ्यात त्वचेवर परिणाम तर होतोच यासह चेहरा काळपट आणि निस्तेज दिसू लागते. थंड हवेचा परिणाम चेहर्यासह कोपर आणि गुडघ्यावर पडतो. या काळात विशेषतः कोपर आणि गुढघे प्रचंड काळपट पडतात. या कारणामुळे आपल्याला पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावे लागते. जर आपण या समस्येमुळे त्रस्त असाल तर, काही घरगुती उपायांचा वापर करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. याचा अवलंब केल्यास लवकरच आपण हा समस्येपासून मुक्त होऊ शकता.
खोबरेल - ऑलिव्ह तेल ठरेल प्रभावी
सर्वप्रथम एका वाटीत खोबरेल तेल, थोडेसे तीळ आणि ऑलिव्ह ऑइल घ्या. आता तिन्ही गोष्टी एकत्र नीट मिसळा आणि थोडावेळ झाकून ठेवा. यानंतर, कोपर आणि गुडघा पाण्याने स्वच्छ करा आणि तयार मिश्रण त्या भागावर लावा. आता हलक्या हातांनी तेल चोळत राहा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून २ वेळा ही प्रक्रिया करा.
कोरफड जेल
सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर आहे. याद्वारे, गुडघे आणि कोपरांना मालिश केल्याने त्वचेच्या मृत पेशी स्वच्छ करण्यास आणि नवीन त्वचा आणण्यास मदत होईल. काळपटपणा घालवण्यासाठी कोरफड जेलने गुडघे आणि कोपर मालिश करा नंतर लिंबू कापून त्यावर चोळा.
दही स्क्रब बनवा
कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी स्क्रब बनवा. यासाठी, एका बाऊलमध्ये १ चमचा दही, व्हिनेगर, २ चमचे साखर मिसळा. तयार स्क्रब काळपट पडलेल्या त्वचेवर लावा. १० मिनिटे ठेवा. नंतर ते कोमट पाण्याने स्वच्छ करा.