Lokmat Sakhi >Beauty > स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

Roshni Chopra demonstrates ‘katori face massage’; know benefits : आपण घरच्या घरी स्टीलच्या छोट्याशा वाटीने देखील मसाज करु शकतो... चेहरा दिसेल यंग आणि ग्लोइंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 08:13 PM2023-09-13T20:13:57+5:302023-09-13T20:32:44+5:30

Roshni Chopra demonstrates ‘katori face massage’; know benefits : आपण घरच्या घरी स्टीलच्या छोट्याशा वाटीने देखील मसाज करु शकतो... चेहरा दिसेल यंग आणि ग्लोइंग...

Elevate your skincare routine with Roshni Chopra's 'Katori face massage technique'. | स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

आपली बिझी लाइफस्टाइल आणि वाढता स्ट्रेस याचे मुख्य दुष्परिणाम हे आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. जास्त ताण घेतल्याचा परिणाम आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेवर देखील दिसून येतो. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना शारीरिक व मानसिक थकवा जाणवतो. ही शारीरिक मरगळ दूर करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणि खर्चिक ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा आपण घरच्या घरी एक सोपी ट्रिक वापरुन झटपट फेस मसाज करु शकतो.

 

फेस मसाज केल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर तसेच चेहेऱ्याच्या त्वचेवर अनेक चांगले (Face Massage Techniques for Healthy Skin) परिणाम दिसून येतात. शक्यतो आपण फेस मसाज करण्यासाठी जेड रोलर, गुआ शा, किंवा इतर फेस मसाज साधनांचा वापर करतो. यांसारख्या फेस मसाजच्या साधनांचा वापर करून फेस मसाज केल्यास त्याचे अधिक चांगले फायदे आपल्याला मिळतात. फेस मसाज केल्याने त्वचेत ब्लड सर्क्युलेशन होते, त्वचा चमकदार दिसू लागते, रक्तप्रवाह सुधारतो, त्वचा अधिक तरुण दिसू लागते. परंतु असे असले तरीही आपल्याला फेस मसाज करण्यासाठी आता पार्लर किंवा स्पा सेंटरमध्ये जायची गरज भासणार नाही. आपण घरच्या घरी स्टीलच्या छोट्याशा वाटीने देखील मसाज करु शकतो. हिंदी अभिनेत्री आणि अँकर रोशनी चोप्रा (Roshni Chopra demonstrates ‘katori face massage’; know benefits) हिने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन छोट्याशा वाटीने फेस मसाज कसा करावा ? याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे(Elevate your skincare routine with Roshni Chopra's 'Katori face massage technique').

छोटयाशा वाटीने फेस मसाज नेमका कसा करावा ? 

आपल्या किचनमध्ये असणाऱ्या छोट्याशा स्टीलच्या वाटीच्या मदतीने देखील आपण फेस मसाज करु शकतो. वाटीने फेस मसाज करण्याआधी आपल्या चेहऱ्यावर खोबरेल तेल, किंवा फेस ऑईल, फेस मॉइश्चरायझर सगळीकडे हलकेच लावून घ्यावे. त्यानंतर छोटीशी स्वच्छ वाटी घेऊन या वाटीच्या खालच्या सपाट पृष्ठभागाच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करून घ्यावा. हा मसाज करताना आपण भुवया, मानेकडील भाग, गाल, कपाळ यांसारख्या भागांवर मसाज करु शकतो. हा मसाज करताना आपण ही वाटी चेहेऱ्यावर खालून वरच्या दिशेने व वरुन खालच्या दिशेने अशा प्रकारे फिरवू शकतो. अशाप्रकारे जोपर्यंत चेहऱ्याला लावलेले तेल किंवा मॉइश्चरायझर त्वचेत संपूर्णपणे शोषले जात नाही तोपर्यंत हलक्या हाताने मसाज करत राहावा. 

फेशियल तर करतोच पण हे मेडी फेशियल नेमकं काय आहे, फेशियलचा नवा ट्रेंड...

दिवसभर ए.सी मध्ये बसता, ५ टिप्स - कोरडी - निस्तेज तर नाही झाली तुमची त्वचा ?

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

वाटीने फेस मसाज करण्याचे फायदे :- 

१. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
२. त्वचा मुलायम होते.
३. त्वचा चमकदार बनते. 
४. रक्त प्रवाह वाढतो.
५. मसल्स टोनिंग आणि लिफ्टिंग करण्यास मदत होते. 
६. त्वचेला आराम देते व तणाव कमी करते.

Web Title: Elevate your skincare routine with Roshni Chopra's 'Katori face massage technique'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.