बदलेली जीवनशैली, व्यस्त दिनचर्या, प्रदूषण या घटकांचा परिणाम आरोग्यावर होतो. या परिस्थितीत जर त्वचेची योग्य काळजी घेतली गेली नाही तर चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या पडतात. चेहेऱ्यावरील एजिंगच्या समस्येसाठी (reduce skin aging) योग्य उपाय शोधत असाल तर तर इसेन्शिल ऑइलचा मसाज ( Essential oil massage ) हा योग्य पर्याय ठरेल. पाच प्रकारच्या इसेन्शिअल ऑइलमध्ये (Essential oils) चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्याचे गुणधर्म असतात.
Image: Google
1. रोजमेरी इसेन्शिअल ऑइल
चेहेऱ्यावरील सुरक्त्या घालवण्यासाठी रोजमेरी इसेन्शिअल ऑइलचा उपयोग होतो या तेलात जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. तसेच यात ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मही भरपुर असतात. रोजमेरी इसेन्शिअल ऑइलनं मसाज केल्यानं त्वचा निरोगी राहाण्यास मदत होते. तसेच या तेलामध्ये असलेल्या ऑक्सिडेटिव्ह गुणधर्मामुळे त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होतं.
Image: Google
2. लेमन इसेन्शिअल ऑइल
लेमन इसेन्शिअल ऑइलमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट असतात. तसेच यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. या तेलामध्ये ॲण्टि एजिंग गुणधर्म असल्यानं त्वचेचं सुरकुत्यांपासून संरक्षण होतं. तसेच या तेलानं चेहेऱ्याचा मसाज केल्यास सूर्याच्या अती नील किरणांपासूनही त्वचेचं संरक्षण होतं.
Image: Google
3. कॅरेट सीड ऑइल
त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी कॅरेट सीड ऑइलचा उपयोग होतो. चेहेऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी , त्वचेवर चमक येण्यासाठी कॅरेट सीड ऑइलचे काही थेंब घेऊन त्याने त्वचेचा मसाज करावा.
Image: Google
4. रोज इसेन्शिअल ऑइल
गुलाबाच्या फुलात त्वचेस फायदेशीर अनेक गुणधर्म असतात. त्वचेवरील सुरकुत्या घालावण्यासाठी रोज इसेन्शिअल ऑइलचा उपयोग करता येतो. गुलाबाच्या या तेलात ॲण्टिऑक्सिडण्ट आणि जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. रोज इसेन्शिअल ऑइलच्या तेलानं मसाज केल्यास सुरकुत्यांसोबतच चेहेऱ्यावरील लालसरपणा दूर होतो तसेच त्वचेवर आलेला ताणही निघून जाऊन चेहेरा प्रसन्न राहातो.
Image: Google
5. चंदन इसेन्शिअल ऑइल
चंदनाच्या तेलात सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. चंदन इसेन्शिअल ऑइलचा उपयोग करुन त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या सोडवता येतात. या तेलानं मसाज केल्यानं त्वचा ओलसर राहाते. यामुळे कोरड्या त्वचेची, त्वचेवरील सुरकुत्यांची समस्याही दूर होते.