Lokmat Sakhi >Beauty > चाळिशीतही दिसा विशीतले, अशी घ्या शरीराची काळजी, दिसाल तरुण

चाळिशीतही दिसा विशीतले, अशी घ्या शरीराची काळजी, दिसाल तरुण

Look Young in 40s खराब जीवनशैली, खानपान आणि विविध ब्युटी प्रोडक्ट्समुळे चेहरा लवकरच वयस्कर दिसू लागतो. अशी घ्या चेहऱ्यासह शरीराची काळजी, दिसून येणार नाही वय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 01:35 PM2022-11-21T13:35:44+5:302022-11-21T13:36:51+5:30

Look Young in 40s खराब जीवनशैली, खानपान आणि विविध ब्युटी प्रोडक्ट्समुळे चेहरा लवकरच वयस्कर दिसू लागतो. अशी घ्या चेहऱ्यासह शरीराची काळजी, दिसून येणार नाही वय..

Even in your 40s you will look young, take care of your body, you will look young | चाळिशीतही दिसा विशीतले, अशी घ्या शरीराची काळजी, दिसाल तरुण

चाळिशीतही दिसा विशीतले, अशी घ्या शरीराची काळजी, दिसाल तरुण

वृद्धत्व ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यातून प्रत्येकाला जावे लागते. जस जसं वय वाढत जातं, तस तसं चेहऱ्यावर वृद्धत्व दिसून येतं. काहींच्या चेहऱ्यावर वृद्धत्व लवकर दिसून येतं तर काहींचा चेहरा हा चिरतरुण असतो. खराब जीवनशैली, खाण्याची शैली आणि विविध ब्युटी प्रोडक्ट्समुळे चेहरा लवकरच वयस्कर दिसू लागतो. वयाच्या चाळीशीनंतर अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. त्यामुळे महिला अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. त्वचेची योग्य काळजी घेतल्याने चेहऱ्यावरील वयाचा प्रभाव कमी होतो. पण चेहऱ्यासोबतच शरीराच्या इतर भागांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपले शरीर हे एकमेकांच्या नसांपासून जोडले गेले आहे. जर आपण शरीरातील इतर भागांची काळजी घेतली. तर आपला चेहरा चिरतरुण दिसेल यात शंका नाही.

हात

वयानुसार आपण चेहऱ्याची काळजी घेतो. मात्र, चेहऱ्यासह हातांची काळजी घेणं तितकेच महत्त्वाचे आहे. कारण असे की चेहऱ्याच्या आधी माणसाच्या हातावर सुरकुत्या पडू लागतात. ज्याच्यावरून लोक पाहताक्षणी आपलं वय किती असेल हे ओळखतात. त्यामुळे व्यायाम आणि योगा करणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित हातांचा व्यायाम करणे आणि योग्य आहार वेळेवर खाणे हे देखील आपल्या शरीरावरील वृद्धत्व कमी करण्यास मदत करते.

आयब्रो

जर आपण नेहमी भुवया सेट करत असाल, तर वाढत्या वयात ही चूक कधीही करू नका. तरुण दिसण्यासाठी, चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रो ठेवा. जाड आणि दाट भुवया कमी वय दर्शविण्यास मदत करतात. त्यामुळे थ्रेडिंग करण्याऐवजी काही दिवस भुवया वाढवा आणि नंतर सेट करा. जेणेकरून वय कमी दिसेल. छोट्या वयात कधी आयब्रो करू नये. कारण विशिष्ट वय झाल्यानंतर भुवयांवर असलेली स्किन सैल पडते.

त्वचेसाठी योग्य प्रोडक्ट्स

मेकअप प्रोडक्ट्ससह स्किन केअर प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर जे सूट होईल तेच खरेदी करा. चेहऱ्याच्या गरजेनुसार प्रोडक्ट्स खरेदी करा आणि त्याचा योग्यरीत्या वापरा. जेणेकरून त्वचेवर त्याचा योग्य परिणाम होतो. रासायनिकयुक्त प्रोडक्ट्स टाळावे. त्याचा परिणाम विशिष्ट वयानंतर दिसू लागतो.

योग्य फाऊंडेशनचा वापर

वयानुसार फुल कव्हरेज फाउंडेशन वापरण्याऐवजी मध्यम किंवा हलके कव्हरेज फाउंडेशन लावा. जेणेकरून चेहरा जास्त जड आणि हेवी मेकअप वाटणार नाही. हलके फाउंडेशन चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी मदत करतात. 

ओठांना ठेवा हायड्रेटेड

त्वचेसोबत ओठांना नेहमी हायड्रेटेड ठेवा. आपण जर चेहऱ्यावर अधिक मेकअपचा वापर करत नसाल. तर लिपग्लॉसच्या मदतीने ओठ मऊ ठेवा. थंडीच्या दिवसात ओठ निर्जीव आणि कोरडे पडतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Web Title: Even in your 40s you will look young, take care of your body, you will look young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.