त्वचेवर चामखीळ (Skin Tag) म्हणजे चंद्रासारख्या चेहऱ्यावर काळा डाग. चामखीळमुळे चेहऱ्यावरील सौंदर्य काही अंशी कमी होते. चामखीळ शरीरावर बऱ्याच ठिकाणी येतात. पण मुख्य म्हणजे मान, चेहरा आणि पाठीवर अधिक करून निर्माण होतात. हे लटकणारे डाग लवकर निघत नाही.
जर मानेवर जास्त प्रमाणात चामखीळ असेल तर, ज्वेलरी घातल्यानंतर याचा त्रास होतो. पेपिलोमा हा विषाणू त्वचेवर चामखीळ येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. यामुळे नकळत आपल्या शरीरावर चामखीळ तयार होतात. चामखीळ काढण्यासाठी बरेच जण विविध उपाय करून पाहतात. पण महागड्या उपायांपेक्षा आपण घरगुती गोष्टींचा (Home Remedies) वापर करूनही चामखीळ काढू शकता(Everything to Know About Skin Tag Removal).
चामखीळ काढण्यासाठी काही घरगुती उपाय
बटाटा
बटाट्याचा वापर फक्त भाजी करण्यासाठी नसून, त्वचेच्या विविध समस्या सोडवण्यासाठीही होऊ शकतो. बटाट्याचा गुणकारी रस चामखीळाच्या समस्येवर प्रभावी ठरते. यासाठी बटाट्याचा तुकडा घ्या, आणि चामखीळावर हलक्या हाताने चोळा. असे केल्याने चामखीळ कोरडे होतात. नियमित असे केल्याने ३ ते ४ दिवसात चामखीळ निघून जाईल.
कांद्याचा रस
कांद्याच्या रसाने देखील चामखीळ निघू शकते. यासाठी कांद्याचा रस काढा, तयार रस चामखीळावर लावा. चामखीळ सुकल्यानंतर ते स्वतः निघून पडेल. यासाठी दररोज कांद्याचा रस चामखीळावर लावा.
खोबरेल तेल
तीळ आणि चामखीळ काढण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. यासाठी चामखीळावर १० ते १५ मिनिटांसाठी खोबरेल तेल लावा, त्यानंतर त्यावर लसणाची पेस्ट लावा. ही पेस्ट चामखीळावर तशीच ठेवा. काही वेळानंतर थंड पाण्याने धुवून काढा. काही आठवडे असे केल्याने नक्कीच याचा फायदा होईल.
मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?
लसूण
लसणाची पाकळी चामखीळ काढण्यासाठी मदत करू शकते. यासाठी फक्त आपल्याला लसणाची पाकळी चामखीळावर घासायची आहे, त्यानंतर पाण्याने धुवून काढा. आठवडाभर असे केल्याने काही दिवसात चामखीळ निघून पडेल.