हेअर स्पा केल्यामुळे नेमक काय होतं असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हेअर स्पा का करायचा याचे नेमके उत्तरच आपल्याला माहित नसते. हेअर स्पा करण्याआधी खरं तर ते करण्याचे फायदे माहित करून घेणं गरजेचे असते. हेअर स्पाला एक प्रकारे केसांची डी - स्ट्रेस थेरपी मानलं जातं(10 Benefits of Hair Spa Treatment).
महिन्यातून एकदा हेअर स्पा केल्यास त्याचे आपल्या केसांना अनेक फायदे होतात. री - हाइड्रेटिंग थेरेपी केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी मदत करते. हेअर स्पा (Importance of Hair spa) करण्यासाठी थोडा जास्त खर्च येत असला तरी देखील स्पामुळे केसांचे हरवलेल सौंदर्य परत मिळू शकत. हेअर स्पानंतर आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. याचबरोबर हेअर स्पा केल्याने आणखी काय फायदे होतात ते पाहूयात(Hair Spa Benefits).
हेअर स्पा म्हणजे म्हणजे नेमकं काय ?
हेअर स्पा हा एक केसांवर केला जाणार असा उपचार आहे ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळतं. केसांना फ्रेश लुक देण्यासाठी आणि केसांच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी नियमित हेअर स्पा करणं फार गरजेचे असते. हेअर स्पा मुळे केस तजेलदार आणि चमकदार दिसू लागतात. बऱ्याचजणी केस सुंदर दिसावेत म्हणून केसांवर अनेक ट्रिटमेंट्स, स्टायलिंग किंवा असंख्य केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करतात. यामुळे केसांच्या मुळांना इजा पोहचून केसांचा पोत, नैसर्गिक चमक निघून जाते. यामुळे केस खराब दिसू लागतात व केसांचे नुकसान होते. केसांचे नुकसान होऊ नये यासाठी वेळोवेळी केसांना हेअर स्पा करण्याची गरज असते.
केसांना लावण्याचे रबरबॅण्ड कळकट झाले म्हणून फेकू नका, ५ टिप्स-रबरबॅण्ड दिसतील नव्यासारखे...
हेअर स्पा करण्याचे फायदे :-
१. हेअर स्पा केल्यामुळे केसांची योग्य वाढ होते. केसांच्या वाढीसोबतच आपले केस चमकदार आणि घनदाट दिसू लागतात.
२. केस वरून चांगले दिसत असले तरी त्यांच्या मुळांमध्ये अस्वच्छता असू शकते. परंतु हेअर स्पा केल्यामुळे आपल्या केसांची मुळे स्वच्छ होतात.
३. आजकाल अनेकींना केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या सतावत असते. हेअर स्पा मुळे केसांची त्वचा कंडीशनर होते. केसांमधील घाण, धूळ, माती कमी झाल्यामुळे कोंडा होण्याची समस्याही हळूहळू कमी होते.
४. सध्या अकाली केस गळण्याची समस्या देखील फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. नियमित हेअर स्पा केल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण देखील कमी होते.
५.नियमित हेअर स्पा केल्यामुळे केसांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ज्यामुळे केस हायड्रेट राहतात. हेअर स्पा मुळे केस मऊ आणि मुलायम होतात.
६. जर केसांना सारखेच फाटे फुटत असतील तर आपल्या केसांना हेअर स्पा ची गरज आहे. कारण हेअर स्पा मुळे केस कोरडे पडत नाहीत त्यामुळे त्यांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते.
७. जर आपण योग्य आहार नाही घेतला तर त्याचा दुष्परिणाम आपल्या केसांवर दिसू लागतो. मऊ आणि तजेलदार केस हवे असतील तर संतुलित आहार घ्यावा आणि नियमित हेअर स्पा करावे.
केसांना लावण्याचे रबरबॅण्ड कळकट झाले म्हणून फेकू नका, ५ टिप्स-रबरबॅण्ड दिसतील नव्यासारखे...
८. जर केस धुतल्यावरही केस तेलकट दिसत असतील तर आपल्या केसांमधील तेलाचे योग्य नियंत्रण करणं गरजेचं आहे. यासाठी हेअर स्पा एक उत्तम उपाय ठरु शकतो.
९. हेअर स्पा मध्ये केल्या जाणाऱ्या हेअर मसाजमुळे आपल्या केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण चांगले होते.
१०. पहिल्यांदा हेअर स्पा केल्यावर त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. परंतु वेळोवेळी हेअर स्पा केल्याचा चांगला परिणाम दिसू लागतो. कारण हा चांगला परिणाम पुढे दीर्घकाळ टिकू शकतो. हेअर स्पा मुळे आपल्या केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांचे आरोग्य सुधारते.