Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर सतत एलोवेरा जेल चोपडताय? वाढू शकतात स्किन प्रॉब्लेम्स कारण...

चेहऱ्यावर सतत एलोवेरा जेल चोपडताय? वाढू शकतात स्किन प्रॉब्लेम्स कारण...

Excessive Aloe Vera Use Can Harm Your Skin : Side effects of aloe vera on skin : त्वचेसाठी एलोवेरा जेल चांगले म्हणून सतत वापरता फायद्याऐवजी होईल नुकसान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 20:05 IST2025-02-11T19:53:50+5:302025-02-11T20:05:57+5:30

Excessive Aloe Vera Use Can Harm Your Skin : Side effects of aloe vera on skin : त्वचेसाठी एलोवेरा जेल चांगले म्हणून सतत वापरता फायद्याऐवजी होईल नुकसान...

Excessive Aloe Vera Use Can Harm Your Skin Side effects of aloe vera on skin | चेहऱ्यावर सतत एलोवेरा जेल चोपडताय? वाढू शकतात स्किन प्रॉब्लेम्स कारण...

चेहऱ्यावर सतत एलोवेरा जेल चोपडताय? वाढू शकतात स्किन प्रॉब्लेम्स कारण...

केस आणि त्वचेचे सौंदर्य व आरोग्य चांगले राहावे यासाठी एलोवेरा जेलचा वापर केला जातो. आपल्यापैकी बऱ्याचजणी त्वचेची काळजी घेण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करतात. आजकाल (Excessive Aloe Vera Use Can Harm Your Skin) अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये तसेच त्वचेसाठी अनेक घरगुती उपाय करताना सर्रास एलोवेरा जेलचा वापर केला जातो. कित्येक प्रकारचे फेसमास्क, फेसपॅक यामध्ये एलोवेरा जेल मिसळून आपण ते त्वचेला लावतो. एवढंच नाही तर काहीवेळा आपण कुंडीतील कोरफडीचे पान कापून थेट त्याचा गर त्वचेवर लावतो(Side effects of aloe vera on skin).

त्वचा आणि केसांच्या अनेक लहान मोठ्या समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा जेल अतिशय फायदेशीर ठरते खरे पण, सतत त्वचेसाठी एलोवेरा जेलचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न काहीवेळा आपल्याला पडतोच. अनेकवेळा आपण त्वचेवरील पिंपल्स, पुरळ किंवा त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करतो. परंतु बरेचदा काहीवेळा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात एलोवेरा जेलचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेच्या  समस्या कमी होण्याऐवजी वाढतात आणि त्या अधिकच त्रासदायक होतात. यासाठीच एलोवेरा जेलचा त्वचेसाठी गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास काय नुकसान होते याबद्दल ब्यूटी एक्स्पर्टकडून अधिक माहिती समजून घेऊयात. 

त्वचेसाठी सतत एलोवेरा जेलचा वापर केल्यास... 

एलोवेरा जेल आवश्यकतेपेक्षा जास्त वापराल तर त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. एलोवेरा जेल मर्यादित प्रमाणात वापरल्यास ते फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही ते जास्त प्रमाणात वापरले तर काही मुलींमध्ये त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, याचा जास्त वापर केल्याने त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा काळे डाग देखील पडू शकतात.

कोरडे-झाडूसारखे रखरखीत झालेले केस होतील मऊ, ‘हा’ हेअरमास्क करतो केसांवर जादू एका दिवसात...

थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...

त्वचेचे होऊ शकते नुकसान... 

१. त्वचा काळी पडू शकते :- एलोवेरा जेलचा जास्त वापर केल्याने त्वचेवर त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी  वाढत जातात. जर तुम्ही एलोवेरा जेलचा जास्त वापर केला तर ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण वाढवू शकते आणि तुमचा चेहरा चिकट होऊ शकतो. एवढेच नाही तर त्वचेवर जास्त प्रमाणात एलोवेरा जेलचा वापर केल्याने त्वचा काळी पडू शकते आणि त्वचेला कोरडेपणा देखील येऊ शकतो. 

२. कमी वयात सुरकुत्या येतात :- एलोवेरा जेलचा सतत जास्त वापर केल्यामुळे काहींना लहान वयातच त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात. याचबरोबर, जर एलोवेरा जेलचा वापर थोडा जास्त केला तर त्वचेवर मुरुम येऊ शकतात, जे सहज बरे होऊ शकत नाहीत. एलोवेरा जेल वापरण्यापूर्वी, तुम्ही पॅच टेस्ट करावी आणि लक्षात ठेवा की त्याचा जास्त वापर तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो, म्हणून ते योग्य प्रमाणात वापरणे चांगले.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

३. मुरुम - पुरळ येतात :- काही लोकांची त्वचा तेलकट असते. अशा त्वचेला एलोवेरा जेल सूट होत नाही. अशा स्थितीत हे जेल लावल्याने त्वचेला खाज येणे आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्वचेला एलोवेरा जेल लावावे. 

४. त्वचेचा पोत बिघडतो :- आधीच त्वचेवर खूप डाग व पिंपल्स असतील तर चुकूनही एलोवेरा जेल जास्त लावू नये. यामुळे त्वचेला खाज आणि अ‍ॅलर्जी होऊ शकते.

Web Title: Excessive Aloe Vera Use Can Harm Your Skin Side effects of aloe vera on skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.