Join us  

हिवाळ्यात केस गळणं फारच वाढलं आहे? स्वयंपाकघरातल्या ३ गो‌ष्टी वापरा, केस गळणं कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 4:55 PM

Hair Fall in Winter केस गळतात, घरभर पडतात त्यामुळे घाबरुन न जाता करा हे सोपे उपाय

हिवाळ्यात केस गळतीची समस्या सामान्य झाली आहे. केसात कोंडा होणे, केस ड्राय होणे अशा समस्येमुळे केस गळतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. केमिकलयुक्त प्रोडक्ट्स केसांसाठी हानिकारक ठरतात. ज्याने केस अधिक गळतात. या केस गळतीपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपायांचा वापर करून पाहा. घरातील साहित्यातून आपण केस गळतीपासून सुटका मिळवू शकता. 

हिवाळ्यात केसांवर काही नैसर्गिक गोष्टी वापरल्याने केसगळती तर कमी होतेच शिवाय केस निरोगी आणि चमकदार दिसतात. चला तर मग जाणून घेऊया केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या नैसर्गिक उपायांबद्दल, ज्याचा वापर करून तुम्ही हिवाळ्यातही केसांची उत्तम निगा राखू शकता.

घरगुती उपाय करतील केस गळतीपासून सुटका 

मेथी

 

मेथी आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे. मेथीमध्ये असलेले प्रोटीन, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी केसांचे पोषण राखण्याचे काम करतात. मेथीचा वापर केल्याने केस मुळापासून मजबूत होतात यासह केस गळणे कमी होते. मेथीचा वापर केसांसाठी करण्यासाठी सर्वप्रथम मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मेथी बारीक करून केसांना लावा. यानंतर, एक मऊ टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि तो पिळून घ्या आणि केसांना चांगला गुंडाळा. आता ४५ मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. अशाने केसांना नवी चमक येईल, व केस मजबूत होतील.

कढीपत्ता

कढीपत्ता हे अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि कॅरोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. कढीपत्त्यामुळे केस गळणे कमी होते आणि केस वाढण्यासही मदत मिळते. कढीपत्त्याचा वापर केसांसाठी करण्यासाठी सर्वप्रथम, खोबरेल तेलात कढीपत्ता टाका. आणि तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर कोमट होऊ द्या. आणि ते तेल केसांना लावून मसाज करा. रात्रभर तेल केसांवरच ठेवा. सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा. याने केस गळणे आणि पांढरे केस यापासून सुटका होईल.

ग्रीन टी

अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध ग्रीन टी, केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय ग्रीन टी नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करते. अशावेळी 2-3 ग्रीन टी बॅग पाण्यात उकळून थंड करा. आता या पाण्याने केस धुवा. नंतर सध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून 4 वेळा ही प्रक्रिया करून पाहिल्यास केस गळणे कमी होईल.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडी