हिवाळ्यात केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवते. केस तेलकट, निर्जीव, यासह केस गळतीचा सामना प्रत्येक महिलेला करावा लागतो. थंडीच्या या मौसमात टाळू ड्राय होते. ड्राय स्काल्पच्या कारणामुळे केसांवर कोंडा साचतो. त्यामुळे हेअर फॉलची समस्या मोठ्य़ा प्रमाणावर उद्भवते. केसांची समस्या सोडवण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. याने केसांना हानी पोहचण्याची शक्यता दाट असते. आपण जर या केसांच्या समस्येपासून त्रस्त असाल तर आजच काही घरगुती उपाय करून पाहा. हे उपाय आपल्यला नक्की मदत करतील.
केसांवर तेलाचा मसाज
आपली आई आणि आजी आपल्या केसांची काळजी तेल लावून घेते. केसांना तेल लावल्याने केस मजबूत - काळेभोर होतात. आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावल्याने केसांमधील आर्द्रतेची कमतरता दूर होते. त्यामुळे केस कोंडामुक्त होतात यासह केसांना नवी चमक येते.
हीटिंग टूल्समुळे केसांना हानी पोहचते
आपण केसांना स्ट्रेट आणि कर्ली करण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर करतो. या साधनांचा आपण अधिक वापर केलात तर केस कमकुवत होतात. निर्जीव दिसू लागतात आणि केस गळतीला देखील सुरुवात होते. केस गळण्याचे सर्वात मोठे कारण मानल्या जाणार्या हीटिंग टूल्सपासून आपण जितके लांब राहाल तितके चांगले.
आरोग्यदायी गोष्टी खा
आपण जे खातो त्याचा केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. खराब आहारामुळे केस गळू शकतात, म्हणून जीवनसत्त्वे आणि खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त आहाराचे सेवन करा.
हायड्रेटेड राहा
हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात, परंतु आपण दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्यावे. पाणी न प्यायल्यामुळे केस गळणे, निस्तेज त्वचेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अधिकाधिक पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा.