How Lips Can Indicate Your Health: ओठ आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक अवयव आहेत. ज्यामुळे त्यांची काळजी जास्त घ्यावी लागते. अनेकांना ओठ फाटण्याची किंवा त्यांवर भेगा पडण्याची समस्या होते. अनेकदा फाटलेल्या ओठांमधून रक्तही निघू लागतं. ओठ ड्राय आणि रफ होतात. तुमचे ड्राय झालेले ओठ तुमच्या आरोग्याबाबत खूप काही सांगतात. पण त्याआधी ओठ ड्राय कशामुळे होतात आणि कशामुळे फाटतात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. तसेच यावर उपाय काय हेही जाणून घेऊया.
का फाटतात ओठ?
vedantsir_ नावाच्या इनस्टाग्रामवर हेल्थ एक्सपर्ट वेदांत यांनी एका व्हिडिओद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, ९० टक्के लोकांना त्यांचे ओठ फाटण्याचं कारण माहीत नसतं. ओठ शरीरात अनेक पोषक तत्व कमी असल्यानंही फाटतात. अशात याची कारणं आणि यावर काय उपाय करता येईल हे जाणून घेऊ.
ओठ फाटल्यावर काय कराल?
पाण्याची कमतरता - जर तुमचे ओठ नेहमीच आणि जास्त फाटत असतील तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. अशात रोज किमान ३ ते ४ लीटर पाणी प्यायला हवे.
ओमेगा ३ ची कमतरता - जर तुमच्या ओठांच्या खालचा भाग जास्त फाटत असेल त्याचं मांस निघत असेल तर शरीरात ओमेगा ३ कमी असल्याचा संकेत असू शकतो. यासाठी तुम्ही नियमितपणे अक्रोड खाल्ले पाहिजे.
व्हिटामिन बी२ ची कमतरता - जर ओठ साइडनं क्रॅक होत असतील आणि त्यातून रक्त येत असेल तर हा व्हिटामिन बी२ कमी असल्याचा संकेत असू शकतो. यासाठी तुम्ही मशरूम खायला हवे.
ओठांचा रंग हलका होणे
जर तुमचे ओठ आधी गुलाबी होते आणि नंतर त्यांचा रंग हलका झाला असेल तर हे आयर्नच्या कमतरतेमुळे होतं. यासाठी तुम्ही नियमितपणे पालक खावी.
ओठ काळे पडणे
अनेकांचे ओठ अचानक काळे पडतात. यामागचं कारण मेलानिनची कमतरता असू शकतं. हे मिळवण्यासाठी तुम्ही नियमितपणे आवळे खाल्ले पाहिजेत.
ओठ गुलाबी आणि मुलायम करण्याचे उपाय
जर तुम्हाला गुलाबी आणि मुलायम ओठ हवे असतील तर यासाठी आठवड्यातून एकदा अर्धा चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध आणि थोडीशी साखर मिक्स करून ओठांवर लावा. १० ते १५ मिनिटं हे मिश्रण ओठांवर राहू द्या आणि नंतर हलक्या हातानं ओठांची मालिश करा. त्यानंतर ओठ पाण्यानं धुवून घ्या. तसेच ओठ मुलायम ठेवण्यासाठी ओठांवर आणि नाभीमध्ये खोबऱ्याचं तेल किंवा तूप टाका.