Join us

केस पिकले? कमी वयात डाय लावण्याची भिती वाटते? १ उपाय, काळेभोर-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:44 IST

How To Make Homemade Black Hair Dye Without Heena : कलर किंवा डाय केल्यानंतर काही दिवसांतच केस पांढरे होऊ लागतात आणि लोकांना वारंवार केस काळे करावे लागतात. 

आजकाल केस पांढरे होण्याची (White Hairs) समस्या खूपच  कॉमन आहे. बरेच लोक या त्रासात असतात. अधिकाधिक लोक पांढरे केस लपवण्यासाठी  हेअर कलरचा वापर करतात किंवा डाय करतात. हे हेअर कलर्स महागडे असण्याबरोबरच टिकाऊ नसतात. कलर किंवा डाय केल्यानंतर काही दिवसांतच केस पांढरे होऊ लागतात आणि लोकांना वारंवार केस काळे करावे लागतात. (Hair Care Tips)

केसांना वारंवार काळे करण्यासाठी त्यात वापरण्यात आलेले केमिकल्स केसांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम करतात. बाजारात मिळणारे हेअर कलर्स आणि डाय यात वेगवेगळे केमिकल्स असतात. यापासून बचावासाठी आणि केसांना नैसर्गिकरित्या काळे बनवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. (Experts Tells How To Make Homemade Black Hair Dye Without Heena)

चहा पावडर आणि मुर्दा सिंघीचा उपाय करून तुम्ही केस नैसर्गिकरित्या काळे करू शकता. केसांना दीर्घकाळ काळे ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते समजून घेऊ. चहा पावडर, मुर्दा सिंगी यांपासून तयार केलेला एक उपाय करून तुम्ही केस ६ महिने काळे ठेवू शकता. केसांना नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यासाठी खास उपाय पाहूया.

नैसर्गिकरित्या केस काळे करण्याचा उपाय१) चहा पावडर- २ चमचे

२) मेहेंदी- १०० ग्राम

३) मुर्दा सिंगी- एक चतुर्थांश 

४) मोहोरीचं तेल - गरजेनुसार

मुर्दा सिंगी तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे चहा पावडर वाटून घाला. त्यात शंभर ग्राम मेहेंदी पावडर, खाण्याचा चुना आणि मूर्दा सिंघी घालून व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर या पेस्टमध्ये गरजेनुसार मोहोरीचं तेल मिसळा ते  मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट असू नये. अर्ध्या तासासाठी असंच सुकायला ठेवा. 

रोज ब्रश करूनही दात पिवळेच? केळीच्या सालीसोबत हा पदार्थ दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे चहा पावडर घ्या. नंतर यात १०० ग्राम मेहेंदी पावडर घ्या. या पेस्टमध्ये गरजेनुसार मोहोरीचं तेल घाला नंतर द्रावण तयार करा. जे जास्त जाड नसेल किंवा पातळ नसेल. नंतर हे मिश्रण केसांना लावा आणि अर्धा तास सुकू द्या. त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्या.  ही पेस्ट लावून केस काळेभोर दाट होतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी