स्किनसाठी (Skin Care Tips) उपयुक्त ठरणारे आपण बऱ्याच गोष्टी करतो. आजकाल धूळ, माती आणि प्रदुषणामुळे स्किन अधिक खराब होते (Alum). टॅन होते. यासह पोर्समध्ये घाण जमा होते (Pimples). ज्यामुळे स्किनच्या अनेक समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात बऱ्याचदा स्किन रुक्ष होते. यासह कोरडी होते. रुक्ष त्वचेवर मेकअप सहसा टिकून राहत नाही. स्किनच्या समस्या सोडवण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो. पण रासायनिक उत्पादनांमुळे चेहरा अधिक खराब होतो. अशावेळी तुरटीचा वापर करून आपण पाहू शकता.
तुरटीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यात टीसेप्टिक, प्रतिजैविक, अँटी-ट्रायकोमोनास असे अनेक गुणधर्म असतात. ज्यासाठी तुरटी खूप फायदेशीर मानली जाते. पण याचा स्किनसाठी वापर कसा करावा? यामुळे स्किनला कोणता फायदा मिळतो? चेहऱ्यावर नेमकं तुरटी कधी लावावी?(Explore the Alum Stone Benefits for Your Skin and Hair in Winter).
'ही' कंपनी डेटिंग आणि रोमान्स करण्यासाठी कर्मचाऱ्यांना देतेय भरपूर पैसे; कारण ऐकून म्हणाल..
तुरटी आणि गुलाब पाणी
थंडीत चेहरा निर्जीव दिसतो. अशावेळी आपण तुरटीचा वापर करून पाहू शकता. एका वाटीमध्ये तुरटी घ्या. त्याची बारीक पूड तयार करा. नंतर तुरटी पावडरमध्ये गुलाब पाणी घाला. गुलाब पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर, तयार केलेली पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. आता सर्कुलेशन मोशनमध्ये हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. किमान १५ मिनिटे मसाज करा. १५ मिनिट मसाज केल्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.
चेहऱ्यावर तुरटी लावण्याचे फायदे
- चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकता. यामुळे मुरुमांचे डाग दूर होतील.
- तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी तुरटीचा वापर खूप गुणकारी आहे. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते.
- वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. त्वचा सैल होत असेल तर, तुरटीचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावर घट्टपणा येईल.
वाटीभर मेथी दाण्यांचे करा पौष्टीक लाडू, कडू अजिबात होणार नाही; हिवाळ्यात दुखण्यांपासून राहाल लांब
- चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठीही तुरटी उपयुक्त ठरते.
- डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठीही तुरटीचा वापर केला जातो.