Lokmat Sakhi >Beauty > थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील..

थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील..

Make up tips: थर्टीफस्ट पार्टीची जय्यत तयारी सुरू झाली, ड्रेस वगैरे सगळं काही फायनल केलं... मग आता या घ्या आय लायनर (how to apply eyeliner) लावण्याच्या सॉलिड ट्रिक्स... मिळेल कमाल लूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 02:51 PM2021-12-28T14:51:58+5:302021-12-30T17:58:20+5:30

Make up tips: थर्टीफस्ट पार्टीची जय्यत तयारी सुरू झाली, ड्रेस वगैरे सगळं काही फायनल केलं... मग आता या घ्या आय लायनर (how to apply eyeliner) लावण्याच्या सॉलिड ट्रिक्स... मिळेल कमाल लूक!

Eye Make up tips for a party look, try this catcy eyeliner styles for thirty first celebration | थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील..

थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील..

Highlightsआय लायनर लावण्याची नविन स्टाईल ट्राय करून पहा..

न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीसाठी किंवा सध्या लग्नाचा मौसम सुरूच आहे, तर एखाद्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी मेकअप कसा करावा, किंवा थोडंसंच काहीतरी करून हटके लूक कसा मिळवावा, असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आता आपल्याला मिळालंच असं समजा. आपल्या मेकअपचा एक मुख्य भाग असतो आय मेकअप. म्हणूनच आय मेकअप थाेडा वेगळ्या पद्धतीने करा, आय लायनर लावण्याची नविन स्टाईल ट्राय करून पहा.. मग बघा तुमचा लूक कसा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके ठरतो ते...

 

१. फ्लोटिंग क्रिझ आय लायनर (Floating crease eyeliner)
आय लायनर लावण्याची ही एक मस्त पद्धत आहे. अशा पद्धतीने आय लायनर लावण्यासाठी पेन्सिल किंवा पेन आयलायनरचा वापर करा. हे आय लायनर मॅट नको. ग्लॉसी लायनर जास्त परफेक्ट ठरतील. अशा प्रकारचं आय लायनर लावायचा असेल तर डोळ्याच्या ज्या आतल्या कडा आहेत, त्यावरही एक स्ट्रोक येऊ द्या आणि एक स्ट्रोक डोळ्यांच्या बाहेरच्या कडांच्या वर जाऊ द्या. यामुळे तुम्हाला एक मस्त कॅची लूक मिळेल. 

 

२. डबल विंग आय लायनर (double wing eyeliner)
नावानुसार लगेचच लक्षात येतं की हे आय लायनर लावताना आपल्याला दोन स्ट्रोक द्यायचे आहेत. अशा पद्धतीचं आय लायनर  लावल्याने तुमच्या डोळ्यांना निश्चितच एक बोल्ड लूक मिळेल. असं आयलायनर लावण्यासाठी सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आयलायनर लावा. यानंतर डोळ्यांच्या वरच्या बाहेरच्या कडांना त्रिकोणी आकार द्या. आता असाच एक आकार त्याच्या वर काढा. दोन लेयर्स दिसतात म्हणून याला डबल विंग आय लायनर म्हणतात. 

आय लायनर लावताच येत नाही, हात थरथरतो? 5 गोष्टी करा, परफेक्ट लावा आय लायनर..

 

 

३. रेड आय लायनर (red eye liner)
काळ्या रंगाचं आय लायनर आपण नेहमीच लावतो. आता त्याला लाल रंगाने थोडं ट्विस्ट करा. बऱ्याचदा थर्टीफस्ट पार्टीसाठी लाल आणि काळ्या रंगाचा ड्रेस कोड ठरवला जातो. तुम्हीही याच रंगाचं काही घालणार असाल तर हे अशा पद्धतीचं आय लायनर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. असं आय लायनर लावण्यासाठी सगळ्यात आधी तर डोळ्यांना नेहमीप्रमाणे काळं आयलायनर लावून घ्या. त्यानंतर त्यावर लाल रंगातल्या कोणत्याही शेडचा वापर करून आय लायनर लावा. हा लूक खूपच सॉलिड दिसतो. 

 

४. निऑन आय लायनर (Neon eyeliner)
निऑन प्रकारचे ब्राईट रंग असणारे आय लायनरही डोळ्यांचा मेकअप खुलवतात. थर्टीफस्ट सारख्या पार्टीसाठी तयार होताना तर असेच फंकी रंग खूप ॲट्रॅक्टीव्ह आणि आयकॅची ठरतात. त्यामुळे ब्लू ते ग्रीन अशा कोणत्याही रंगातल्या निऑन आय लायनरचा वापर केला तर निश्चितच तो तुमचा लूक बदलून टाकणारा ठरेल. 

लिपस्टिक सतत टचअप करायचा कंटाळा येतो? लिपस्टिक ओठांवर जास्त वेळ राहावी म्हणून ४ सोपे उपाय

 

 

५. पेस्टल आयलायनर  (Pastel-hued eyeliners)
खूप डार्क किंवा ब्राईट आय लायनर लावायला आवडत नसेल तर पेस्टल शेडमधील कोणतंही आय लायनर तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये लाईट, हलके रंग येतात, ते आकर्षकही दिसतात. नुसतीच पेस्टल शेड नको असेल तर आधी काळ्या आय लायनरची बेस लाईन काढून त्यावरही तुम्ही पेस्टर शेड आयलायनर लाऊ शकता. यामुळे डोळ्यांचा लूक आणि आय लायनरचा रंग अधिक खुलून दिसेल. 

 

Web Title: Eye Make up tips for a party look, try this catcy eyeliner styles for thirty first celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.