Lokmat Sakhi >Beauty > सकाळी लावलेलं काजळ दुपार होत नाही तर पसरतं? ५ टिप्स, एकदा काजळ लावा-दिवसभर डोळे दिसतील सुंदर

सकाळी लावलेलं काजळ दुपार होत नाही तर पसरतं? ५ टिप्स, एकदा काजळ लावा-दिवसभर डोळे दिसतील सुंदर

How To Apply Kajal Perfectly: या ५ ट्रिक्स वापरून पहा... खूप महागडं काजळ नसलं तरी ते तुम्हाला Long Lasting आणि Smudge-proof लूक देईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 07:50 PM2022-05-25T19:50:24+5:302022-05-25T19:51:24+5:30

How To Apply Kajal Perfectly: या ५ ट्रिक्स वापरून पहा... खूप महागडं काजळ नसलं तरी ते तुम्हाला Long Lasting आणि Smudge-proof लूक देईल...

Eye Makeup Tips: 5 Simple tricks for long lasting and smudge proof kajal, No need to waste money for costly kajal | सकाळी लावलेलं काजळ दुपार होत नाही तर पसरतं? ५ टिप्स, एकदा काजळ लावा-दिवसभर डोळे दिसतील सुंदर

सकाळी लावलेलं काजळ दुपार होत नाही तर पसरतं? ५ टिप्स, एकदा काजळ लावा-दिवसभर डोळे दिसतील सुंदर

Highlights५ स्टेप्स व्यवस्थित फॉलो करून लावलेलं काजळ खरोखरंच Long Lasting आणि Smudge-proof इफेक्ट देईल.

काजळ लावल्यानंतर अनेक जणींची एक सारखीच समस्या म्हणजे थोड्याच वेळात काजळ पसरतं आणि मग डोळ्यांखाली सगळंच काळं- काळं दिसू लागतं.. असा 'पांडा आय' लूक टाळायचा म्हणून मग आपण जास्तीचे पैसे खर्च करून महागडं काजळ खरेदी करतो. पण तरीही शेवटी जे व्हायचं तेच होतं.. फार फार तर काय की जे एखाद्या तासाने होणार असतं ते दोन तासांनी होतं, एवढाच काय तो फरक. असं झालं की मग पैसे उगाच वाया गेल्याचं दु:ख होतं, ते वेगळंच..


म्हणूनच तर काजळ लावण्यासाठी या ५ अतिशय सोप्या ट्रिक्स वापरून पहा. उन्हाळ्यात खूप घामघाम होतो, त्यामुळे काजळ पसरतं. पावसाळ्यातही पावसामुळे किंवा दमट हवामानामुळे ही समस्या जाणवते. म्हणूनच तर कोणताही ऋतु असला तरी काजळ पसरण्याचा त्रास जाणवतोच. हा त्रास कमी करण्यासाठी पुढील ५ टिप्स नक्कीच उपयोगी पडतील. आणि स्वस्तातलं काजळही तुम्हाला महागड्या काजळापेक्षा उत्तम असा Long Lasting आणि Smudge-proof लूक देईल. करून बघा..

 

काजळ Long Lasting आणि Smudge-proof राहण्यासाठी टिप्स
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काजळ लावण्याआधी डोळ्याच्या खालच्या भागाला बर्फ लावून काही सेकंद मसाज करा. यासाठी एका रुमालामध्ये बर्फाचा तुकडा टाका. आणि अलगद त्याने खालच्या पापण्यांच्या खाली असणाऱ्या भागावर दाब द्या. खूप जोरजोरात दाबू नका. बर्फ नसेल तर रुमाल किंवा टिश्यू पेपर थंड पाण्यात बुडवा. तो पिळून घ्या आणि नंतर त्याने डोळ्यांखाली मसाज करा. यामुळे डोळ्यांच्या भागात येणारा तेलकटपणा कंट्रोल केला जाईल.
२. यानंतर दुसरी स्टेप म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूला लॅक्टोकॅलामाईन, बीबी क्रिम किंवा सीसी क्रिम यांच्यापैकी काहीही लावून काही सेकंदांसाठी हलक्या हाताने मसाज करा. जास्त जोर अजिबात देऊ नका. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूचा काळेपणा कमी होईल.

 

३. काजळ लावताना आपण डोळ्याच्या खालची त्वचा थोडीशी ओढतो आणि मग काजळ लावतो. असं करणं टाळा. त्वचा अजिबात ओढू नका. फक्त थोडंसं वर बघा आणि तसेच पापण्यांवरून अलगद काजळ पेन्सिल फिरवा. डोळ्याचं जे नाकाजवळचं टोक असतं, तिथून पाणी येतं आणि त्यामुळे काजळ सर्वात जास्त पसरतं. त्यामुळे त्या भागात काजळ लावणं टाळा.


४. काजळ लावल्यानंतर त्याच्या खाली अलगदपणे वॉटरफ्रुप आयलायरन लावा. यामुळे काजळ आपोआप आहे त्या ठिकाणी लॉक होऊन जाईल आणि खूप वेळ न पसरता जसंच्या तसंच राहील.
५. यानंतर शेवटची स्टेप म्हणजे काजळाच्या खाली हलक्या हाताने रूज पावडर लावा. ते नसेल तर कोणतीही टाल्कम पावडर किंवा बेबी पावडर लावली तरी चालेल. या ५ स्टेप्स व्यवस्थित फॉलो करून लावलेलं काजळ खरोखरंच Long Lasting आणि Smudge-proof इफेक्ट देईल.

 

Web Title: Eye Makeup Tips: 5 Simple tricks for long lasting and smudge proof kajal, No need to waste money for costly kajal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.