Join us  

डोळ्यांचा ताण कमी करणारे आय मास्क!! थकलेल्या डोळ्यांना मिळेल थंडावा- होतील रिफ्रेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2022 8:00 AM

How To Refresh Eyes: सतत स्क्रिनवर काम करून डोळ्यांवर ताण (eye stress) येतोच.... म्हणूनच थकलेल्या डोळ्यांना रिफ्रेश करण्यासाठी वापरून बघा हे घरगुती आय मास्क (home made eye mask).

ठळक मुद्देथकलेल्या डोळ्यांवर काकडीचे काप ठेवायचे, एवढंच आपल्याला माहिती असतं. पण त्या व्यतिरिक्तही इतर अनेक प्रकारचे आय मास्क वापरून डोळ्यांचा थकवा घालवता येतो. 

काही जणांना कामाचं स्वरुप म्हणून दिवसाचे ८- १० तास सतत लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करावं लागतं. तर काही जणं स्क्रिन ॲडिक्शनमुळे (screen addiction) दिवसांतले कित्येक तास सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रिनवर डोळे लावून बसलेले असतात. खूप जास्त प्रमाणात स्क्रिन पाहिली गेली की डोळ्यांवर ताण येतोच. रात्रीच्या वेळी तर डोळे खोल गेल्यासारखे आणि खूपच थकल्यासारखे (eye fatigue) वाटतात. त्यामुळेच तर डोळ्यांचा थकवा घालवून त्यांना पुन्हा रिेफ्रेश करण्यासाठी हे काही घरगुती आयमास्क (home made eye mask) वापरून पहा. थकलेल्या डोळ्यांवर काकडीचे काप ठेवायचे, एवढंच आपल्याला माहिती असतं. पण त्या व्यतिरिक्तही इतर अनेक प्रकारचे आय मास्क वापरून डोळ्यांचा थकवा घालवता येतो. 

 

घरगुती आय मास्क१. गुलाब जल

सतत स्क्रिनसमोर बसता, डोळ्यांवर ताण आला? ११ उपाय, शिणलेल्या डोळ्यांचा त्रास कमी हा एक उपाय अनेक जणांना माहिती असेल. कारण बऱ्याचदा ब्यूटी पार्लरमध्ये फेशियल करताना डोळ्यांवर गुलाब जल आय मास्क ठेवण्यात येतो. हा उपाय करण्यासाठी गुलाब पाण्यात कापुस भिजवून घ्या. त्यानंतर संपूर्ण डोळा आणि त्याच्या आजूबाजूचा भाग झाकला जाईल अशा पद्धतीने कापसाची घडी डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांना आणखी थंडावा मिळावा म्हणून हा उपाय करण्याआधी काही वेळ कापुस फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये ठेवलेला थंडगार कापुस डोळ्यांवर ठेवला तर डोळे आणखी जास्त रिलॅक्स होतात.

 

२. टी बॅग आय मास्कघरात असणाऱ्या टी बॅग काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर स्वच्छ थंड पाण्यात त्या बुडवा. बॅगला हलक्या हाताने दाबून त्यांच्यातले जास्तीचे पाणी काढून टाका. आता या टी बॅग ४ ते ५ मिनिटांसाठी तुमच्या बंद डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा तर दूर होईलच पण डार्क सर्कल्सही कमी होतील.

 

३. बटाटा आणि पुदिनासौंदर्यासाठी बटाटा आणि पुदिना या दोन्ही गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत. तसंच त्या डोळ्यांचा थकवा घालविण्यासाठीही फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. हा उपाय करण्यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. त्यात थोडा पुदिन्याचा रस टाका. हे दोन्ही रस एका वाटीत एकत्र करा. ही वाटी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर या थंड रसमध्ये कापुस बुडवा. कापुस हलकासा दाबुन जास्तीचा रस काढून टाका. आता कापसाची घडी बंद डोळ्यांवर ४ ते ५ मिनिटांसाठी ठेवा. डोळ्यांना खूप शांत वाटेल. तसेच बटाट्यात असणारे घटक डोळ्यांच्या आसपास असणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतील.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगा