Lokmat Sakhi >Beauty > भुवयांचे केस पांढरे व्हायला लागलेत? हा त्रास टाळण्यासाठी स्वस्त आणि मस्त उपाय..

भुवयांचे केस पांढरे व्हायला लागलेत? हा त्रास टाळण्यासाठी स्वस्त आणि मस्त उपाय..

डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढते ते काळ्याभोर, जाडसर आणि रेखीव आयब्रोमुळे. पण वाढते प्रदुषण आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेक जणींचे डोक्यावरचे केस तर पांढरे होतच आहेत, पण त्यासोबतच भुवयांचे केसही रंग बदलू लागले आहेत. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर अजिबात टेन्शन न घेता, हे स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय करून पहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 01:08 PM2021-06-16T13:08:00+5:302021-06-16T13:27:31+5:30

डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढते ते काळ्याभोर, जाडसर आणि रेखीव आयब्रोमुळे. पण वाढते प्रदुषण आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेक जणींचे डोक्यावरचे केस तर पांढरे होतच आहेत, पण त्यासोबतच भुवयांचे केसही रंग बदलू लागले आहेत. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर अजिबात टेन्शन न घेता, हे स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय करून पहा....

Eyebrow hair turned white, gray ? simple and cool home remedies to avoid this problem .. | भुवयांचे केस पांढरे व्हायला लागलेत? हा त्रास टाळण्यासाठी स्वस्त आणि मस्त उपाय..

भुवयांचे केस पांढरे व्हायला लागलेत? हा त्रास टाळण्यासाठी स्वस्त आणि मस्त उपाय..

Highlightsआवळ्याचे आहारात नियमित सेवन या समस्येवर गुणकारी ठरू शकते.उन्हात फिरताना किंवा प्रदुषणापासून बचाव म्हणून भुवयाही कव्हर होईल, असा मोठा गॉगल लावणे किंवा स्कार्फ बांधताना तो भुवयांनाही झाकून टाकेल याची काळजी घ्यावी.

भुवयांचा आकार प्रत्येकीच्या चेहऱ्यानुसार वेगवेगळा असतो.  प्रत्येकीची आपापली चॉईस असू शकते. कुणाला जाडसर भुवया आवडतात, तर कुणाला अगदी पातळ कोरलेल्या आयब्रो आवडतात. कुणाला आपल्या भुवयांना धनुष्याचा आकार द्यायला आवडतं तर कुणाला गोलाकार रेखाटलेल्या भुवया आवडतात. आकार कसाही आवडत असला तरी भुवयांचा रंग कसा असावा, याबाबत मात्र ९९ टक्के महिलांना काळ्याशार भुवया आवडतात. ब्युटीशियनकडून भुवयांचा आकार एकवेळ बिघडला तरी चालेल. पण रंगाच्या बाबतीत मात्र नो कॉम्प्रमाईज अशी अनेकींची भूमिका आहे. 
पण नेमकी आता इथेच सगळी गडबड सुरू झाली आहे. डोक्याचे केस पांढरे होेणे, हे आपण जड मनाने का होईना पण स्विकारले होते. पण भुवयांमध्ये पांढरे केस डोकावू लागल्याने मात्र आता अनेक जणी हैराण झाल्या आहेत. खाण्यापिण्यात थोडे बदल केले आणि काही घरगुती उपाय केले तर ही समस्या आपण सहजपणे सोडवू शकतो.


हे उपाय करून पहा
१. आवळा ठरेल असरदार
एक आवळा घेऊन त्याच्या अगदी बारीक बारीक फोडी करा. या फोडी वाटीभर पाण्यात उकळत ठेवा. जेव्हा उकळून उकळून पाणी अर्धे होईल आणि आवळ्याच्या फोडींचा रंग बदलल्यासारखा वाटेल, तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होईपर्यंत झाकूण ठेवा. थंड झालेले पाणी तुमच्या भुवयांवर चोळा. १५- २० मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका

२. बीट आणि काॅफीचा कॉम्बो
दोन टेबल स्पून बीटरूटचा रस घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवून त्यात एक टी स्पून कॉफी टाका. पाणी जवळपास अर्धे होईपर्यंत त्याला चांगली उकळी येऊ द्या. यानंतर यामध्ये दोन चमचे बीट रूटचा रस टाका आणि त्याला देखील हलकीशी उकळी येऊ द्या. यानंतर या पाण्यावर झाकण ठेवून ते थंड होऊ द्या. थंड झालेले पाणी हलक्या हाताने भुवयांवर चोळा.

३. कच्चे दुध
चेहरा अधिक चमकदार होण्यासाठी ज्याप्रमाणे कच्चे दुध लावतात, तसेच कच्चे दुध भुवयांवरही लावत जा. यामुळेही भुवयांचे केस काळे राहतील आणि अधिक दाट दिसतील. 

Web Title: Eyebrow hair turned white, gray ? simple and cool home remedies to avoid this problem ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.