भुवयांचा आकार प्रत्येकीच्या चेहऱ्यानुसार वेगवेगळा असतो. प्रत्येकीची आपापली चॉईस असू शकते. कुणाला जाडसर भुवया आवडतात, तर कुणाला अगदी पातळ कोरलेल्या आयब्रो आवडतात. कुणाला आपल्या भुवयांना धनुष्याचा आकार द्यायला आवडतं तर कुणाला गोलाकार रेखाटलेल्या भुवया आवडतात. आकार कसाही आवडत असला तरी भुवयांचा रंग कसा असावा, याबाबत मात्र ९९ टक्के महिलांना काळ्याशार भुवया आवडतात. ब्युटीशियनकडून भुवयांचा आकार एकवेळ बिघडला तरी चालेल. पण रंगाच्या बाबतीत मात्र नो कॉम्प्रमाईज अशी अनेकींची भूमिका आहे. पण नेमकी आता इथेच सगळी गडबड सुरू झाली आहे. डोक्याचे केस पांढरे होेणे, हे आपण जड मनाने का होईना पण स्विकारले होते. पण भुवयांमध्ये पांढरे केस डोकावू लागल्याने मात्र आता अनेक जणी हैराण झाल्या आहेत. खाण्यापिण्यात थोडे बदल केले आणि काही घरगुती उपाय केले तर ही समस्या आपण सहजपणे सोडवू शकतो.
हे उपाय करून पहा१. आवळा ठरेल असरदारएक आवळा घेऊन त्याच्या अगदी बारीक बारीक फोडी करा. या फोडी वाटीभर पाण्यात उकळत ठेवा. जेव्हा उकळून उकळून पाणी अर्धे होईल आणि आवळ्याच्या फोडींचा रंग बदलल्यासारखा वाटेल, तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होईपर्यंत झाकूण ठेवा. थंड झालेले पाणी तुमच्या भुवयांवर चोळा. १५- २० मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका
२. बीट आणि काॅफीचा कॉम्बोदोन टेबल स्पून बीटरूटचा रस घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवून त्यात एक टी स्पून कॉफी टाका. पाणी जवळपास अर्धे होईपर्यंत त्याला चांगली उकळी येऊ द्या. यानंतर यामध्ये दोन चमचे बीट रूटचा रस टाका आणि त्याला देखील हलकीशी उकळी येऊ द्या. यानंतर या पाण्यावर झाकण ठेवून ते थंड होऊ द्या. थंड झालेले पाणी हलक्या हाताने भुवयांवर चोळा.
३. कच्चे दुधचेहरा अधिक चमकदार होण्यासाठी ज्याप्रमाणे कच्चे दुध लावतात, तसेच कच्चे दुध भुवयांवरही लावत जा. यामुळेही भुवयांचे केस काळे राहतील आणि अधिक दाट दिसतील.