Lokmat Sakhi >Beauty > Eyebrow Shaping : घरच्याघरी आयब्रोजना शेप देण्यासाठी वापरा 'या' टिप्स; पार्लरशिवाय मिळेल परफेक्ट फिनिशिंग

Eyebrow Shaping : घरच्याघरी आयब्रोजना शेप देण्यासाठी वापरा 'या' टिप्स; पार्लरशिवाय मिळेल परफेक्ट फिनिशिंग

Eyebrow Shaping At Home : आयब्रोजना शेप देणं काही सोपं काम नाही. काही ट्रिक्स आणि लहान  मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही आपल्या आयब्रोजन चांगला आकार देऊ शकता.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 01:34 PM2021-08-29T13:34:14+5:302021-08-29T14:21:17+5:30

Eyebrow Shaping At Home : आयब्रोजना शेप देणं काही सोपं काम नाही. काही ट्रिक्स आणि लहान  मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही आपल्या आयब्रोजन चांगला आकार देऊ शकता.  

Eyebrow Shaping At Home : How to shape up your eyebrows at home eyebrow grooming tips | Eyebrow Shaping : घरच्याघरी आयब्रोजना शेप देण्यासाठी वापरा 'या' टिप्स; पार्लरशिवाय मिळेल परफेक्ट फिनिशिंग

Eyebrow Shaping : घरच्याघरी आयब्रोजना शेप देण्यासाठी वापरा 'या' टिप्स; पार्लरशिवाय मिळेल परफेक्ट फिनिशिंग

Highlights कोरफड जेल किंवा बदाम तेल लावून आपल्या आयब्रोजची, कपाळाची मसाज करा. यासाठी तेलाचे फक्त दोन ते तीन थेंब पुरेसे आहेत.

(Image Credit- bindu.co.nz, You tube)

आयब्रोजचा शेप जर व्यवस्थित नसेल तर संपूर्ण चेहऱ्याचा लूक बदलतो.  पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज करून आल्यानंतर एका आठवड्यातच पुन्हा नवीन केस दिसायला सुरूवात होते. तर काहींच्या आयब्रोजचे केस लवकर वाढत नाहीत. पण लवकर केस वाढल्यानंतर हे फारसं चांगलं दिसत नाही. आयब्रोजना शेप देणं काही सोपं काम नाही. काही ट्रिक्स आणि लहान  मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही आपल्या आयब्रोजन चांगला आकार देऊ शकता.  

१) ब्रश

आपल्या आयब्रोजना योग्य आकार देण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना योग्यरित्या ब्रश करा आणि त्याच दिशेने ब्रश करा ज्या दिशेनं तुम्हाला तुमच्या आयब्रोजना आकार द्यायचा आहे.

२) कात्री

आता तुम्हाला बारिक आणि लहान कात्री लागेल. जेणेकरून तुम्ही तुमच्या भुवयांचे केस कापू शकता.  केस ट्रिम करताना खालून वर कापा. अशा प्रकारे कात्री वापरल्याने भुवया दाट दिसतात. या दरम्यान, स्पूली (गोलाकार भुवया ब्रश) च्या मदतीने वरच्या आयब्रोज वरच्या दिशेत न्या. असं केल्याने केस जाड दिसतात. जर तुम्ही तुमचे केस वरपासून खालपर्यंत कापले तर तुमचे केस सरळ कापले जातील. यामुळे भुवया जाड होण्याऐवजी पातळ दिसतील

३) ट्विजर , प्लकर

आयब्रोजमध्ये आर्च तयार करण्यासाठी ट्विजर आणि प्लकरचा वापर तुम्ही करू शकता. ट्विजर आणि प्लकर आयब्रोजना शेप देण्यासाठीचे वेगवेगळे चिमटे असतात. जे तुमच्या आर्च तयार करण्यासाठी आणि आजूबाजूचे केस काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला आयब्रोजचा आकार कसा हवाय  हे मनात ठरवून घ्या त्यानुसार भुवयांमधून जास्तीचे केस काढू शकाल.

४) रेजर

आता रेझर वापरून किंवा डर्माप्लॅनिंग ब्लेड वापरून, चेहऱ्यावरील आयब्रोजच्या आसपासचे एक्स्ट्रा केस काढून टाकू शकता. असे केल्याने भुवयांना स्पष्ट जागा मिळते आणि चेहरा अधिक स्वच्छ दिसतो. याशिवाय तुम्ही कपाळ आणि त्वचेवरली इतर केस  वॅक्सिंग  स्ट्रिप्सचा वापर करून काढू शकता.

त्यासाठी पील अप वॅक्स स्ट्रिप्स लहान लहान आकारात कापून घ्या आणि केसांना वॅक्स लावून मग स्ट्रिप्स चिकटवून केस काढून टाका. घरी वॅक्स करताना सावधगिरी बाळगा नाहीतर त्वचेला जखम होणं, लालसरपणा येण्याची शक्यता असते. स्पूली किंवा बेबी टूथब्रशने आपले केस पुन्हा ब्रश करा आणि मागे कोणतेही अतिरिक्त केस शिल्लक नाहीत हे तपासा.  लहान केस दिसल्यास त्यांना काळजीपूर्वक ट्रिम करा किंवा प्लकरने काढा.

५) जेलनं मसाज

आता कोरफड जेल किंवा बदाम तेल लावून आपल्या आयब्रोजची, कपाळाची मसाज करा. यासाठी तेलाचे फक्त दोन ते तीन थेंब पुरेसे आहेत. असे केल्याने, भुवयांचे केस देखील सेट होतात आणि जिथे तुम्ही एक्स्ट्रा केस काढले आहेत त्या त्वचेवर लालसरपणा येणार नाही.
 

Web Title: Eyebrow Shaping At Home : How to shape up your eyebrows at home eyebrow grooming tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.