डोळे हा चेहऱ्याचा सर्वात महत्वाचा आणि सुंदर भाग आहे. टपोरे डोळ्यांमुळे चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी खुलते. मात्र, डोळ्यांची अधिक शोभा भुवया वाढवतात. भुवयांशिवाय चेहरा अपुर्ण आहे. तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्यावर भुवया असण्याचे दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे, डोळ्यांपासून मॉइश्चर दुर ठेवते. दुसरे म्हणजे चेहऱ्यावरच्या घामापासून संरक्षण करते. ज्यामुळे आपल्याला दिसायला त्रास होत नाही.
भुवया या एखाद्या चेहऱ्याची छाप पूर्णपणे बदलू शकते. दाट आयब्रो कमी केले की, संपूर्ण चेहऱ्याचा लूक बदलतो. मात्र, जर भुवया बारीक, पातळ आणि विरळ असतील तर, काय करावे असा प्रश्न अनेकींना पडला असेल. काहींचे आयब्रो लहानपणापासून बारीक असतात. तर काहींचे अॅलर्जी, ऑटोइम्यून डिसऑर्डर, किंवा फंगल इन्फेक्शनमुळे बारीक होतात. अशा परिस्थित काही घरगुती उपाय करून पाहा. यामुळे आयब्रो केस दाट व सुंदर दिसतील.
भुवयांच्या केसांना दाट बनवण्यासाठी काही टिप्स
एरंडेल तेल
आपल्याला जर काळ्या आणि दाट भुवया हव्या असतील तर, एरंडेल तेलाचे वापर करून पाहा. याचा थेट वापर करू नका तेलासोबत मिक्स करून लावा. या उपायामुळे भुवयांची वाढ होण्यासोबत ते काळे आणि मजबूत बनतील. एरंडेल तेलामध्ये असलेली प्रथिने, फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आयब्रोच्या केसांना पोषण देतील.
खोबरेल तेल
खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत. त्यातील पौष्टीक घटक शरीरासाठी उपयुक्त आहे. औषधी गुणधर्मांनी भरलेले हे तेल त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. जाड आणि काळ्या भुवयांसाठी रोज खोबरेल तेलाने मसाज करा. हलक्या हातांनी मसाज करा, यामुळे तेल आयब्रोच्या पोर्सपर्यंत जातील व आतून दाट बनवतील.
ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमीन ए, डी आणि क आढळतात. भुवया दाट करण्यासाठी याचा वापर करून पाहा. रोज रात्री झोपण्यापूर्वी भुवयांना या तेलाने ५-१० मिनिटे मसाज करा. यामुळे भुवया दाट होतील.
कच्चे दुध
भुवया जाड आणि काळ्या करण्यासाठी कच्चे दूध फायदेशीर ठरेल. कापसाच्या मदतीने दूध भुवयांवर लावा. असे केल्याने भुवया काळ्या, जाड आणि चमकदार होतील.
कांद्याचा रस
जेवणाची चव वाढवणारा कांदा शरीरातील इतर गोष्टींसाठी फायदेशीर आहे. जाड व काळ्या भूवयांसाठी कांद्याच्या रसाचा वापर करा. कांद्याच्या रसामुळे केस दाट व काळेभोर होतात.
एलोवेरा जेल
कोरफडमध्ये हर्बल आणि औषधी गुणधर्मांचा साठा आहे. ज्यामुळे केसांची समस्या दूर होते. यासाठी दिवसातून दोनवेळा एलोवेरा जेलने भुवयांचा मसाज करा. भुवयांचे केस नाजूक असल्यामुळे त्यांना हलक्या हाताने मसाज करा. ज्यामुळे अधिक फायदा होईल.