आपला चेहरा आखीव - रेखीव व सुंदर दिसण्यात डोळ्यांवरील भुवया (Eyelashes & Eyebrow magic serum at home For fast hair growth) मुख्य भूमिका बजावतात. जाड, भरीव, लांब भुवया एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात नक्कीच भर पाडतात. अशा रेखीव भुवया प्रत्येकीला हव्या असतात पण काहीजणींच्या भुवया या खूपच पातळ असतात. भुवयांचे केस पातळ व विरळ (Eyelashes & Eyebrow DIY Growth Homemade Serum) असल्यामुळे भुवयांना हवा तसा लूक मिळत नाही. एवढंच नव्हे तर काहीजणांच्या बाबतीत भुवयांसोबतच पापण्यांचे केस देखील खूपच पातळ आणि विरळ असतात. अशावेळी आपल्या भुवया आणि पापण्यांचे केस जाड व भरीव दिसावेत यासाठी कित्येक स्त्रिया आयब्रो पेन्सिल, मस्कारा अशा गोष्टींचा वापर करतात. आयब्रो पेन्सिल, मस्कारा वापरल्याने भुवया, पापण्या छान दिसतात परंतु हा काय कायमचा उपाय नसतो(How To Make Eyelashes & Eyebrow Serum at home).
आजकाल अनेक स्त्रिया डोळ्यांच्या भुवया आणि पापण्यांचे केस दाट करण्यासाठी मायक्रोब्लेडिंग आणि लॅमिनेशन यांसारख्या महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेतात. परंतु या महागड्या ट्रिटमेंट्सचे काही तोटे देखील आहेत. काहीवेळा या ट्रिटमेंट्स सगळ्यांच्याच त्वचेला सूट होतील अशा नसतात. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करूनही आपण आपले आयब्रो आणि पापण्यांचे केस नैसर्गिक पद्धतीने भरीव व दाट करु शकतो. भुवया आणि पापण्यांचे केस जाड व भरीव करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा रोजच्या वापरातील नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन भुवया आणि पापण्या अधिक आकर्षक बनवता येऊ शकतात. भुवया आणि पापण्यांच्या केसांना दाटपणा येण्यासाठी नैसर्गिक पदार्थांपासून होममेड सीरम कसे करायचे ते पाहूयात.
साहित्य :-
१. बदाम - २२. खोबरेल तेल - १ टेबलस्पून ३. ऑलिव्ह ऑईल - १ टेबलस्पून ४. एरंडेल तेल - १ टेबलस्पून ५. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल - १ कॅप्सूल ६. पेट्रोलियम जेली - १ टेबलस्पून
बहुगुणी आवळा केसांसाठी नवसंजिवनीनी, फक्त 'या' ४ पद्धतींनी वापर करा, हेअर प्रॉब्लेम्स होतील कमी...
आलिया भट म्हणते, मी वापरतच नाही फाऊंडेशन कधीच! तिच्यासारख्या लूकसाठी करा ४ गोष्टी...
कृती :-
१. सगळ्यात आधी बदाम एका लहानशा चिमट्यात पकडून मेणबत्ती किंवा दिव्याच्या वातीवर धरुन ठेवावा. २. बदामाचा चॉकलेटी रंग बदलून संपूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत दिव्याच्या वातीवर हा बदाम धरुन ठेवावा.
३. बदामाचा रंग बदलून तो संपूर्णपणे काळा झाल्यावर एका खलबत्त्यात असे दोन बदाम घेऊन ते कुटून त्याची पावडर करून घ्यावी. ४. आता एक काचेची छोटीशी बाटली घेऊन त्यात ही बदामाची बारीक केलेली पूड घालावी. त्यानंतर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, एरंडेल तेल, पेट्रोलियम जेली घालावी. सगळ्यात शेवटी यात एक व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल फोडून घालावी. आता कॉटन ईयर बड्सच्या मदतीने सगळे जिन्नस कालवून एकजीव करून घ्यावे. आता या बाटलीचे झाकण गच्च बंद करून हे सीरम स्टोअर करुन ठेवावे.
या घरगुती सीरमचा वापर भुवया आणि पापण्यांच्या केसांसाठी कसा करावा ?
भुवया आणि पापण्यांच्या केसांना दाटपणा यावा तसेच हे केस अधिक काळेभोर आणि जाड दिसावेत यासाठी आपण तयार केलेलं घरगुती सीरम वर्षभर चांगलं टिकून राहात. रोज रात्री झोपताना कॉटन ईयर बड्सच्या मदतीने हे सीरम भुवयांच्या आणि पापण्यांच्या केसांना लावून मग झोपावे. या सीरमचा नियमित वापर केल्याने भुवया आणि पापण्यांच्या केसांना दाटपणा येऊन ते अधिक भरीव, काळेभोर आणि जाड दिसतात.