(Image Credit- David Parry/PA, indy100.com)
कोरोनाकाळात मास्क, ग्लोव्हज, पीपीई किट्सच्या कचऱ्यात वाढ होत आहे. रस्त्याच्या कडेला, नद्यांपासून जंगलापर्यंत सगळीकडेच मास्क पडलेले दिसून येत आहेत. याचाच पुरेपूर फायदा घेत इंग्लंडमधील एका डिजानरनं १५०० पांढऱ्या रंगाच्या डिस्पोजेबल मास्कपासून छानसा गाऊन (Face mask wedding dress) बनवला आहे.
हा वेडिंग ड्रेस पाहून लोक अवाक् झाले आहेत. वेडिंग प्लानंर वेबसाईड Hitched नं या ड्रेससाठी फंडिंग केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये जवळपास १०० मिलियनपेक्षा जास्त डिस्पोजेबल मास्क फेकले गेले आहेत. हा अद्भूत ड्रेस टॉम सिल्वरवुडनं डिजाईन केला आहे. या फ्लोअर लेंथ गाऊनला तयार करण्यासाठी त्यांनी जवळपास १ हजार ५०० मास्क एकत्र शिवले.
इतकंच नाही तर कमरेच्या भागाजवळ हायलाईट करण्यासाठी डिस्पोजेबल प्लास्टिक पीपीई किटचा वापर केला आहे. मॉडल जेमिमा हॅम्ब्रोनं सेंट पॉल कॅथेड्रल येथे ड्रेस घालून फोटोशुट केलं. त्यानंतर हे फोटो तुफान व्हायरल झाले. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच फेसमा स्कपासून असा ड्रेस तयार करण्यात आला. इंग्लँडमध्ये कोरोना माहामारीनंतर लावण्यात आलेला लॉकडाऊन जवळपास २ वर्षांनी हटवला जात आहे.
सध्याचे दिवस लोक फ्रीडम डे च्या रूपात साजरा करत आहेत. तेथील कार्यंक्रमांसाठी असलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. लग्न समारंभांसाठी जवळपास २०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. Hitched च्या संपादकांनी दिलेल्या माहितीनुसार एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा लग्नसराईचा सुरू झाल्यानं आम्हाला खूप आनंद होतोय.