Lokmat Sakhi >Beauty > फक्त २ सिक्रेट पदार्थ लावा आणि वर्षानूवर्षे चेहऱ्यावर असणारे जुनाट डाग घालावा चुटकीसरशी...

फक्त २ सिक्रेट पदार्थ लावा आणि वर्षानूवर्षे चेहऱ्यावर असणारे जुनाट डाग घालावा चुटकीसरशी...

Face Pack For Dark Spots Removal : How to get rid of dark spots using rose petals : गुलाब पाकळ्या - दह्याचा खास फेसपॅक, चेहेऱ्यावरचे काळे डाग, पुरळ, व्रण होतील गायब....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 02:28 PM2024-06-29T14:28:33+5:302024-06-29T15:48:42+5:30

Face Pack For Dark Spots Removal : How to get rid of dark spots using rose petals : गुलाब पाकळ्या - दह्याचा खास फेसपॅक, चेहेऱ्यावरचे काळे डाग, पुरळ, व्रण होतील गायब....

Face Pack For Dark Spots Removal Rose Petals Powder Helps in Reducing Dark Spots How to get rid of dark spots using rose petals | फक्त २ सिक्रेट पदार्थ लावा आणि वर्षानूवर्षे चेहऱ्यावर असणारे जुनाट डाग घालावा चुटकीसरशी...

फक्त २ सिक्रेट पदार्थ लावा आणि वर्षानूवर्षे चेहऱ्यावर असणारे जुनाट डाग घालावा चुटकीसरशी...

चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स येणं ही एक कॉमन गोष्ट आहे. अनेकजणींना या समस्येचा सामना करावा लागतो. चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स, मुरूमं आल्याने चेहरा  खराब दिसतो. चेहेऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. या उपायांमुळे पुरळ, पिंपल्स तर निघून जातात परंतु त्यांचे कधीही न जाणारे काळे डाग स्किनवर पडतात. स्किनवर पडणाऱ्या या काळ्या डागांमुळे त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य कमी होते(Rose Petals Powder Helps in Reducing Dark Spots).

चेहेऱ्यावरचे हे काळे डाग घालवण्यासाठी आपण सगळेच उपाय करून बघतो. हे डाग घालवण्यासाठी वेगवेगळ्या क्रिम्स, लोशन लावले जाते किंवा ब्यूटी ट्रिटमेंट्स केल्या जातात. चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नसतो. हे डाग कमी करण्यासाठी बाजारांत उपलब्ध असलेले  केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरल्यावर हे डाग कमी होण्याऐवजी वाढू शकतात. वेगवेगळ्या कारणांनी आलेले हे पुरळ, फोड कालांतराने कमी होतात पण चेहऱ्यावरचे काळे डाग मात्र तसेच राहतात. असे असले तरीही आपण काही घरगुती उपायांचा वापर करून हे काळे डाग कमी करु शकतो(How to get rid of dark spots using rose petals).

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी... 

चेहेऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या व दही या दोन गोष्टींचा वापर करु शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी ४ ते ६ गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या घ्या. या पाकळ्या स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. आता या पेस्टमध्ये दही मिक्स करून घ्यावे. अशाप्रकारे आपण दही आणि गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवू शकता. 

डोळ्यांवर कुणी पॅक लावते? लावा नॅचरल घरगुती आय पॅक, डोळे दिसतील सुंदर-जळजळही होईल कमी...

गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या व दही याचा फेसपॅक चेहेऱ्यावर लावावा. विशेषतः काळे डाग आहेत त्या भागावर हा फेसपॅक लावून हलक्या हाताने मसाज करून घ्यावा. हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत चेहऱ्यावर तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. प्रत्येक आठवड्यातून दोन दिवस हा घरगुती उपाय केल्यास आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होईल. 

स्वयंपाकघरातील ५ पदार्थांचा १ लहानसा गोळा चेहऱ्यावर करतो जादू!  चमक अशी की लोक विचारतील सिक्रेट..

गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या चेहऱ्यावर लावण्याचे फायदे :- (Benefits of Rose petals for Skin)

१. त्वचेची पीएच लेव्हल मेंटेन करण्यास मदत होते. 
२. डॅमेज झालेल्या त्वचेचा पोत सुधारुन, पुन्हा नव्यासारखी चमक आणण्यास फायदेशीर ठरते. 
३. गुलाबाच्या पाकळ्या त्वचेला मुलायम ठेवण्यास मदत करतात.

दही चेहऱ्याला लावण्याचे फायदे :- (Benefits of Curd for Skin)

१. दही त्वचेवर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यास मदत करते. 
२. दह्याचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा दिर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसते.  
३. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी दही खूप फायदेशीर ठरते.

Web Title: Face Pack For Dark Spots Removal Rose Petals Powder Helps in Reducing Dark Spots How to get rid of dark spots using rose petals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.