आकर्षक दिसण्यासाठी महिला प्रत्येक महिन्यात ब्युटी पार्लरमध्ये जातात. वेगवेगळ्या स्वरुपातील ब्युटी ट्रीटमेंट करत असतात. चेहऱ्यावरील बारीक केसांमुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील शोभा कमी होते. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी महिला व्हॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करतात. पण हे उपाय अतिशय वेदनादायी ठरतात.
चेहऱ्यावरील बारीक केस घरच्या घरी काढायचे असतील तर एक सोपी ट्रिक फॉलो करून पाहा. विशेष म्हणजे हा उपाय करताना फार वेदना देखील जाणवणार नाही. तसंच हा उपाय तुमच्या खिशालाही परवडणारा आहे. यासह नैसर्गिक साहित्यांचा वापर करू हे केस काढण्यास मदत होईल(Face pack to remove facial hair naturally at home).
फेशियल हेअर रिमुव्हल पेस्ट करण्यासाठी लागणारं साहित्य
एक चमचा हळद
एक चमचा मैदा
घामामुळे केसातून दुर्गंधी येते, केस चिकट होतात? २ सोपे उपाय, वारंवार केस धुण्याची गरजच भासणार नाही
एक चमचा पिठीसाखर
गुलाब जल
अशा पद्धतीने करा हेअर रिमुव्हल पेस्ट
रात्री चेहऱ्यावर 'या' तेलाचे २ थेंब लावून झोपा, त्वचेची समस्या होईल कमी, सकाळी दिसाल फ्रेश - सुंदर
सर्वप्रथम, एक वाटी घ्या त्यात हळद, मैदा, पिठीसाखर, गुलाब जल घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. हे मिश्रण हनुवटी, फोरहेड, व अप्पर लिप्सवर लावा. ३० मिनिटानंतर हलक्या हाताने मसाज करा. व ओल्या टॉवेलने चेहरा रब करून पेस्ट काढा, आणि नंतर मॉइश्चरायझर क्रीम लावा. या पेस्टचा वापर आठवड्यातून ३ दिवस करा. ३ दिवस नियमित केल्याने चेहऱ्यावरील केस निघून जातील.