Lokmat Sakhi >Beauty > पहिल्यांदाच फेस रेजरचा वापर करताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी, चुका टळतील, फेस होईल क्लिन

पहिल्यांदाच फेस रेजरचा वापर करताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी, चुका टळतील, फेस होईल क्लिन

Face Shaving Dos And Don'ts For Women चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी फेस रेजरचा करा असा वापर, होणार नाही दुखापत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2023 11:23 AM2023-05-01T11:23:29+5:302023-05-01T11:24:29+5:30

Face Shaving Dos And Don'ts For Women चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी फेस रेजरचा करा असा वापर, होणार नाही दुखापत..

Face Shaving Dos And Don'ts For Women | पहिल्यांदाच फेस रेजरचा वापर करताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी, चुका टळतील, फेस होईल क्लिन

पहिल्यांदाच फेस रेजरचा वापर करताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी, चुका टळतील, फेस होईल क्लिन

वयानुसार शरीरात अनेक बदल घडतात. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर केसांची वाढ होते. काहींच्या शरीरावर केस कमी असतात तर, काहींच्या जास्त. प्रत्येक जण महिन्याला वॅक्सिंग करतोच. वॅक्स करणे हे कितीही फायद्याचे असले तरी, काहींना वॅक्स केल्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, त्वचा लाल होणे, जळजळ होणे असे अनेक त्रास उद्भवतात.

काही लोकं चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी रेजरचा वापर करतात. चेहऱ्यावरील अनावश्यक केस याने झटपट निघतात. पण चुकीच्या पद्धतीने रेजरचा वापर केल्यास चेहऱ्याला हानी देखील पोहचू शकते. त्यामुळे रेजर वापरताना या मुख्य  गोष्टी लक्षात ठेऊनच रेजरचा वापर करा(Face Shaving Dos And Don'ts For Women).

फेस रेजर वापरताना लक्षात ठेवा या ८ गोष्टी

-  फेस रेजरचा वापर करण्यापूर्वी हे रेजर चांगल्या पाण्याने धुवा, यासाठी अँटी सेप्टिक लिक्विडचा वापर करा. असे केल्याने त्वचेवर कोणतीही इन्फेक्शनची समस्या निर्माण होणार नाही.

-  फेस रेजरचा वापर केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका, कारण याने स्किन खराब होण्याची शक्यता वाढते.

- त्वचेवरील अप्पर लिप्स, गालावरील आणि कपाळावरील केस काढण्यासाठी शार्प आणि स्वच्छ रेजरचा वापर करा.

रोज रात्री झोपताना चेहऱ्याला खोबरेल तेल लावा, ४ समस्यांवर १ उपाय, चेहरा होईल नितळ

- रेजरचा वापर केल्यानंतर याला चांगल्या पाण्याने धुवा. खराब रेजरच्या वापरामुळे त्वचेवर पुरळ, काळपट डाग उठण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

- पहिल्यांदाच रेजरचा वापर करत असाल तर, पहिले शरीराच्या अन्य दुसऱ्या भागातील केस काढून पाहा. याने तुम्हाला कल्पना येईल की, केस कोणत्या पद्धतीने काढावे.

- फेस रेजरने शेव करताना डायरेक्शनवर लक्ष ठेवा. कारण डायरेक्शन चुकली तर जखम होण्याची नाकारता येत नाही. नेहमी खालच्या डायरेक्शनने केस काढा.

अर्धा चमचा कॉफी - १ चमचा कोरफडीचा गर! फक्त एवढंच लावा, थकलेला चेहरा दिसेल काही मिनिटात फ्रेश

- फेस रेजर हा नेहमी बारीक निवडा, कारण चेहऱ्यावरील केस हे पातळ व बारीक असतात. त्यामुळे त्याचा ब्लेडही बारीकच हवा.

- फेस रेजर निवडताना त्याचा वापर किती वेळा करता येईल हे तपासा. कारण काही रेजर एकाच वापरासाठी असतात. 

Web Title: Face Shaving Dos And Don'ts For Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.