Best Sleep Position To Avoid Wrinkles: अनेकदा झोपेतून उठल्यावर आरशात चेहरा पाहिल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात किंवा चेहऱ्याची त्वचा सैल झालेली दिसते. तुमच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या सुरकुत्या तुमच्या झोपण्याच्या स्टाईलबाबत खूपकाही सांगतात. याला स्लीप रिंकल्सही म्हणतात.
स्लीप रिंकल्स काही वेळासाठीच राहतात. पण वाढत्या वयासोबतच यामुळे त्वचेवर त्या नेहमीसाठी दिसू शकतात. अशात या सुरकुत्या होऊ नये किंवा त्वचा सैल होऊ नये म्हणून काय करावं हे जाणून घेऊ.
एक कडावर झोपण्याचा प्रभाव
चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची कारणं तशी तर वेगवेगळी असतात. ज्यात वाढतं वय, प्रखर सूर्यकिरणं, धुम्रपान, पाणी कमी पिणे, एकसारखे फेशिअल हावभाव करणं आणि झोपण्याची पद्धत.
कसं झोपल्यानं येतात सुरकुत्या?
जेव्हा तुम्ही एका कडावर किंवा पोटावर झोपता तेव्हा चेहऱ्यावर पाठीवर झोपण्याच्या तुलनेत अधिक दबाव पडतो आणि चेहरा दबला जातो. तसेच झोपेत हालचाल केली तर चेहऱ्याची त्वचा खेचली जाते, दबते आणि वेगवेगळ्या दिशांमध्ये वळते. ज्यामुळे सुरकुत्या तयार होतात. अशात तुम्ही पाठीवर झोपून किंवा झोपण्याची पद्धत पुन्हा पुन्हा बदलून चेहऱ्यावर पडणारा दबाव कमी करू शकता.
चेहऱ्यावरून समजतं कसे झोपता
तरूण असाल तर स्लीप रिंकल्स काही वेळासाठीच राहतात आणि काही वेळानं गायब होतात. पण कालांतरानं याच पद्धतीनं झोपल्यास या सुरकुत्या नेहमीसाठी चेहऱ्यावर दिसू शकतात. कारण वाढत्या वयासोबत त्वचा अधिक लवचिक होते आणि सैल होते. ज्यामुळे सुरकुत्या अधिक दिसतात. एकाच कडावर झोपणाऱ्या लोकांचा चेहरा एका बाजूनं जरा चपटा दिसतो आणि स्लीप रिंकल्सही जास्त दिसतात.
काय कराल उपाय?
कोलेजन आणि इलास्टिन त्वचेच्या आतील थराचे दोन मुख्य घटक असतात. हे त्वचेची संरचना बनवतात आणि त्वचेचा टाइटनेस बनवून ठेवतात. स्किनकेअर रूटीनच्या माध्यमातून कोलेजन वाढवून त्वचेची टाइटनेस वाढवता येऊ शकते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात.