Join us  

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आल्या, टेन्शन छळतंय? मग हे सोपे व्यायाम करा, सुरकुत्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 7:04 PM

वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की, आपोआपच चेहऱ्यावर एजिंग इफेक्ट दिसू लागतो. आता तर प्रदुषण,  बदललेली जीवनशैली यामुळे अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कोणतेही महागडे क्रीम चेहऱ्यावर लावण्यापेक्षा हे काही सोपे व्यायाम केले, तर ते नक्कीच प्रभावी ठरतील.

ठळक मुद्देसाधारणपणे पंचविशीनंतर आपल्या शरीरातील काही हार्मोन्सचे प्रमाण वाढत जाते, तर काही हार्मोन्सचे तसेच प्रोटीन्सचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे चेहऱ्याची इलॅस्टिसिटी कमी होत जाते आणि त्वचा सैल पडत जाते.चेहऱ्याचा एक व्यायाम २० ते २५ सेकंदासाठी करावा. यापेक्षा अधिक वेळ करू नये.

आपण जर नियमित व्यायाम केला नाही, तर आपला बॉडी टोन खराब होतो. म्हणजेच आपली स्कीन लूज पडल्यासारखी दिसते आणि दंड, पोटऱ्या, मांड्या, पोट, कंबर या भागात चरबी वाढत जाते. असेच काहीसे आपल्या चेहऱ्यावर देखील होत असते. त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांच्या व्यायामाप्रमाणे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होणेही गरजेचे आहे. म्हणूनच चेहऱ्यासाठी असणारे काही सोपे व्यायाम केले तर अकाली येणाऱ्या सुरकुत्या जाऊ शकतात.

 

करून बघा हे काही सोपे व्यायाम१. चेहऱ्याचा व्यायाम होण्यासाठी फिश फेस हा प्रकार करू शकता. हा प्रकार करण्यासाठी ओठांचा चंबू करावा. ज्याप्रमाणे सेल्फी काढताना आपण पाऊट करतो, त्याप्रमाणे दोन्ही ओठ एकमेकांना जोडावे आणि गाल आतमध्ये ओेढून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि तेथील रक्तपुरवठा सुरळीत होतो.

 

२. डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा एका जागी स्थिर असू द्या.  यानंतर भुवया उंच करा आणि फक्त डोळे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आणि उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे असे ५- ५ वेळेस फिरवा. यामुळे डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी होतील. 

३. आणखी एका व्यायामानुसार सगळ्यात आधी डोळे बंद करा आणि दोन्ही हातांचे अंगठे दोन्ही डोळ्यांच्या बाहेरच्या टोकांजवळ ठेवा. उरलेली बोटे कपाळावर ठेवा. यानंतर अंगठ्याने डोळ्यांजवळची त्वचा अलगदपणे वर ओढण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम केवळ ५ ते १० सेकंदासाठी करावा आणि हा व्यायाम ३ ते ४ वेळेस रिपिट करावा.

 

४. ओठांजवळच्या आणि गालावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी ओठे एकमेकांपासून थोडेसे अलग करा. यानंतर दोन्ही हातांचे पहिले बोट ओठांच्या दोन्ही बाजूला टोकांवर ठेवा आणि गालांकडे ओढण्याचा प्रयत्न करा. असे ओढताना आपले दोन्ही ओठ एकमेकांना समांतरच राहतील, याची काळजी घ्या. 

 

५. कपाळावरच्या सुरकुत्या घालविण्यासाठी तुमच्या दोन्ही हातांच्या करंगळ्या दोन्ही भुवयांच्या वर ठेवा. यानंतर उरलेली बोटे कपाळावर थोड्या थोड्या अंतराने ठेवा. आता बोटांच्या मदतीने कपाळ डोक्याकडे ओढण्याचा प्रयत्न करा. यामुळे कपाळावरच्या सुरकुत्या नक्कीच कमी होण्यास मदत होते.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमहिला