सध्या उन्हाळा सिझनची जोरदार सुरुवात झाली आहे. उन्हाचा तडाखा आणि उष्णता इतकी असते की उन्हाळ्यात बरेचदा आपल्याला स्किन टॅनिंगची समस्या सतावते. उन्हाळ्यात वारंवार प्रखर सूर्यप्रकाशात बाहेर पडल्याने आपल्या त्वचेवर विशिष्ट प्रकारचा काळ्या रंगाचा थर साचतो. या त्वचेवरील साचून राहिलेल्या थरामुळे आपली त्वचा काळी दिसते ज्याला (Facial Hair removal, De-Tan facepack) आपण 'सन टॅनिंग' असे म्हणतो. त्वचेवरील सन टॅनिंग निघून जाण्यासाठी बरेच (Hair removal MaskIt also removes tanning in just few uses) दिवस लागतात, यासाठी हे सन टॅनिंग जितक्या लवकरात लवकर कमी करता येईल यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु हे उपाय करण्यासाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आपण काही घरगुती उपायांचा वापर करु शकतो.
त्वचेवरील हा सन टॅनिंगचा थर काढण्यासाठीचा उपाय वापरल्याने टॅनिंग तर कमी होतेच शिवाय आपल्या त्वचेवरील नको असलेले अनावश्यक केस देखील काढले जातात. त्वचेवरील अनावश्यक नको असलेले केस काढण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग, शेव्हिंग असे अनेक उपाय करतो. परंतु या उपायांमुळे आपल्या नाजूक त्वचेला इजा पोहोचू शकते, इतकेच नव्हे तर थ्रेडींग, वॅक्सिंग, शेव्हिंग करताना फार दुखते. यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात त्वचेवरील टॅनिंग आणि अनावश्यक केस काढण्यासाठी दोन वेगळे उपाय करण्यापेक्षा आपण हा एकच असरदार घरगुती उपाय करु शकतो. या उपायाच्या वापरामुळे टॅनिंग आणि अनावश्यक केस काढणे अशा त्वचेच्या दोन्ही समस्या एकाच उपायात दूर केल्या जातील.
त्वचेचे टॅनिंग आणि त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यासाठी एकच असरदार उपाय...
त्वचेचे टॅनिंग आणि त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यासाठी आपल्याला वाटीभर दूध, १ टेबलस्पून आंबेहळद, २ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून बेसन इतक्या ४ पदार्थांची गरज लागणार आहे.
त्वचेसाठी नागवेलीचं पान म्हणजे वरदान! त्वचेचे ३ त्रास कायमचे होतात बरे, विड्याचं पान भारीच काम!
नेमकं करायच काय ?
एका भांड्यात दूध घेऊन ते व्यवस्थित गरम करावे. या हलक्या गरम दुधात आंबेहळद, साखर घालून ३ ते ५ मिनिटे सगळे मिश्रण चमच्याने हलवत मंद आचेवर गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण हलके कोमट होऊ द्यावे. मग या कोमट झालेल्या मिश्रणात बेसन घालावे आणि सगळे मिश्रण एकजीव करून त्वचेसाठी फेसपॅक तयार करून घ्यावा. चमच्याच्या मदतीने बेसनाच्या गुठळ्या मोडून घेऊन मध्यम कंन्सिस्टंन्सीची पेस्ट तयार करून घ्यावी.
मोस्टलीसेन प्राजक्ता कोळीच्या सुंदर केसांचं सिक्रेट, तिच्या वडिलांनी तयार केलं ‘असं’ खास तेल...
वापरायचे कसे ते पाहा...
या सगळ्या मिश्रणाची एकत्रित तयार पेस्ट आपल्या त्वचेवर लावून घ्यावी. त्यानंतर हा फेसपॅक थोडा वाळू द्यावा. फेसपॅक हलका वाळल्यानंतर, (पूर्णपणे वाळवू नये) थोडा ओला असेल तेव्हा आपल्या हातांचा पंजा आणि बोटांच्या मदतीने हलकासा मसाज करून घ्यावा. खूप जोरात रगडू नये. ज्या भागांतील अनावश्यक केस काढायचे त्या भागात केसांच्या वाढीच्या उलट्या दिशेने बोटं फिरवून हलकेच दाब देत केस काढून घ्यावे. आपण कपाळ, अप्पर लिप्स, गाल अशा भागांवरील नको असलेले केस अगदी सहजपणे काढू शकता. अशा प्रकारे आपण या एकाच फेसमास्कचा वापर करून टॅन झालेली त्वचा आणि त्वचेवरील अनावश्यक नको असलेले केस अशा त्वचेसंबंधित दोन समस्या दूर करु शकतो.