सणवार म्हटलं की आधी घरातल्या जबाबदार्या, सणाची तयारी असतेच. ते करता करता लक्षात येतं की आजच्या दिवशी आपल्या चेहेर्यावर जी चमक हवी आहे ती तर दिसतच नाहीये. ती आणण्यासाठी ब्यूटी पार्लरमधे जाऊन तास दोन तास घालवण्याइतकाही वेळ नाही. मग काय करायचं? उपाय सोपा आहे. तुमच्या धावपळीतून फक्त 20 मिनिटं काढायचे आणि अँलोवेरा फ्रूट फेशिअल घरच्याघरी करायचं. या फेशिअलमुळे त्वचा लगेच चमकते. कमी बजेटमधे, कमी वेळात जास्त सुंदर दिसण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे. चार स्टेपमधे हे फेशिअल करा आणि सुंदर दिसा.
Image: Google
1. क्लीन्जिग
फेशिअलची पहिली स्टेप असते क्लीन्जिंग. क्लीन्जरमुळे चेहेर्याच्या त्वचेवरील सर्व घाण आणि अन्य प्रदूषित घटक नष्ट होतात. हे फेशिअल अँलोवेरा फ्रूट फेशिअल आहे त्यामुळे हे फेशिअल करताना वेगवेगळ्या स्टेपमधे फळांचा वापर करावा लागतो. क्लीन्जिंग करण्यासाठी 2 मोठे चमचे दही, 1 किंवा 2 मोठे चमचे मध आणि 2 ते 3 ब्ल्यू बेरी एवढी सामग्री घ्यावी.एका वाटीत ब्ल्यू बेरीचा रस काढावा. नंतर त्यात दही आणि मध घालावं. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. मग हे क्लीन्जर थोडं घेऊन ते चेहेर्याला लावावं . क्लीन्जरच्या सहाय्यानं चेहेर्या हळुवार मसाज करावा. नंतर एका स्वच्छ रुमालानं चेहेरा पुसून घ्यावा.
Image: Google
2. स्क्रबिंग
या स्क्रबमुळे चेहेर्यावरील सर्व मृत त्वचा, मृत पेशी निघून जातात. या स्क्रबमुळे त्वचेवरीलर्व बंद रंध्रं निघून जातात आणि चेहेरा चमकदार होतो. स्क्रबमुळे चेहेर्यावरील त्वचेत निरोगी पेशींची वाढ होण्यास मदत मिळते. हे स्क्रब तयार करण्यासाठी 10 मोठे चमचे मध, 5 मोठे चमचे अँलोवेरा जेल, 10 मोठे चमचे ब्राऊन शुगर आणि 8 चमचे संत्र्याचा गर घ्यावा.स्क्रबिंग करण्यासाही एका वाटीत साखर आणि मध एकत्र करावं. ते चांगलं एकजीव झालं की मग त्यात अँलोवेरा जेल घालावं. नंतर यात साखरेसोबतच संत्र्याच्या फोडी पिळाव्यात. मग हे मिर्शण पुन्हा चांगलं फेटून घेतलं की स्क्रब तयार होतं. स्क्रब करण्यासाठी थोडं स्क्रब हातात घेऊन ते पूर्ण चेहेर्यावर लावावं. या पेस्टने चेहेर्याला 4 ते 5 मिनिटं हळुवार स्क्रब करावं. ही पेस्ट 10 ते 15 मिनिटं सुकु द्यावी. सुकल्यानंतर चेहेरा पाण्यानं धुवून , रुमालानं हळुवार टिपून घ्यावा.
Image: Google
3. फेस मसाज
मसाजमुळे चेहेर्याच्या त्वचेखालेल रक्तप्रवाह सुरळीत होतो . रक्तप्रवाह व्यवस्थित असला की त्वचेवर चमक येते. या मसाजमुळे चेहेर्यावरील काळे डाग, मुरुम पुटकुळ्यांचे डाग, सुरकुत्या निघून जातात. या फेस मसाजसाठी 1 मोठा चमचा अँलोवेरा जेल आणि 1 छोटा चमचा गुलाब पाणी घ्यावं.एका वाटीत अँलोवेरा जेल आणि गुलाब पाणी एकत्र करावं. हातावर थोडी पेस्ट घेऊन ती पूर्ण चेहेर्यावर लावावी. या पेस्टने 2 ते 3 मिनिटं चेहेर्यावर बोटं गोलाकार फिरवत हलका मसाज करावा. मसाजनंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. रुमालानं चेहेरा टिपून घ्यावा.
Image: Google
4. फेस पॅक
फेस मसाज नंतर चेहेर्यावर फेस पॅक अर्थात लेप लावावा. या पॅकमधे पोषक घटक आणि जीवनसत्त्वं असतात. त्वचेचं पोषण करण्यासाठी ते मदत करतात. या फेस पॅकमुळे चेहेर्यावरील मुरुम पुटकुळ्या, काळे डाग, सुरकुत्या, ओठांजवळ दिसणार्या रेषा निघून जातात. चेहेरा चांगला मॉश्चराइज होतो आणि चेहेर्यावर नैसर्गिक चमक येते.हा फेस पॅक तयार करण्यासाठी 1 मोठा चमचा अँलोवेरा जेल, 1 पिकलेलं केळ, 1 चिमूट हळद घ्यावी. फेस पॅक तयार करताना पिकलेल्या केळाचे बारीक तुकडे करुन घ्यावेत. फोकच्या सहाय्यानं केळाचे तुकडे कुस्करुन घ्यावेत. त्यात अँलोवेरा जेल आणि चिमूटभर हळद घालावी. हे सर्व व्यवस्थित फेटून घ्यावं. हातावर थोडी पेस्ट घेवून ती पूर्ण चेहेर्याला लावावी. या पेस्टच्या सहाय्यानं चेहेर्याचा दोन ते तीन मिनिट मसाज करावा. मग ही पेस्ट 15 ते 20 मिनिटं सुकू द्यावी. सुकल्यानंतर गार पाण्यानं चेहेरा धुवावा. रुमालानं ओला चेहेरा टिपून घ्यावा.हळदीमधे भरपूर अँण्टिसेप्टिक आणि अँण्टिबॅक्टेरियल गुण असतात. हे गुणधर्म आपल्या त्वचेला कोणत्याही संसर्गापासून वाचवतात.
अशा प्रकारे अवघ्या 20 मिनिटात आपण चेहेर्यावर गेलेली चमक परत आणू शकतो. फेशिअल झाल्यावर चेहेर्याला मॉश्चरायझर अवश्य लावावं. जर हे फेशियल सकाळच्या वेळेत केलं असेल तर मॉश्चरायझरनंतर सनस्क्रीन लावणंही आवश्यक आहे.