Lokmat Sakhi >Beauty > कमी वयातच स्किन सैल पडली? झोपण्यापूर्वी 'या' तेलाच्या २ थेंबाने करा मसाज; चेहरा दिसेल कायम तरुण

कमी वयातच स्किन सैल पडली? झोपण्यापूर्वी 'या' तेलाच्या २ थेंबाने करा मसाज; चेहरा दिसेल कायम तरुण

Facial Massage for Skin Tightening : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज केल्याने सुरकुत्या कमी होतात; शिवाय त्वचा टवटवीत दिसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2024 04:16 PM2024-03-08T16:16:54+5:302024-03-08T16:18:15+5:30

Facial Massage for Skin Tightening : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज केल्याने सुरकुत्या कमी होतात; शिवाय त्वचा टवटवीत दिसते

Facial Massage for Skin Tightening | कमी वयातच स्किन सैल पडली? झोपण्यापूर्वी 'या' तेलाच्या २ थेंबाने करा मसाज; चेहरा दिसेल कायम तरुण

कमी वयातच स्किन सैल पडली? झोपण्यापूर्वी 'या' तेलाच्या २ थेंबाने करा मसाज; चेहरा दिसेल कायम तरुण

महिलावर्ग महिन्यातून एकदा फेशिअल करतात. फेशिअल केल्याने चेहऱ्यावर नवी चमक येते. असे केल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळतो आणि त्वचाही निरोगी राहते (Skin Care Tips). पण पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणं नेहमीच शक्य नाही. बराच खर्च होतो. शिवाय वेळही जातो. पण वयोमानानुसार चेहऱ्याची चमक कमी होते किंवा सैल पडते. त्वचा कायम टवटवीत आणि सैल पडू नये असे वाटत असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी दररोज चेहऱ्याची मालिश करा (Skin Massage).

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मसाज केल्याने दिवसभराचा थकवा कमी होतो, आणि त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणेही कमी होतात (Skin Tightens). चेहऱ्याला मसाज करण्यासाठी आपण तेल, सीरम किंवा लोशन वापरू शकता. पण रात्रीच्या वेळेस मसाज कधी कसा करावा? याची माहिती त्वचा तज्ज्ञ डॉ.सोनिया वर्मा यांनी दिली आहे(Facial Massage for Skin Tightening).

सैल त्वचेसाठी फायदेशीर

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तेल लावून मसाज केल्याने स्किन टोन्ड होते. चेहऱ्यावर मसाज करताना नेहमी वरच्या दिशेने हात फिरवून मसाज करा. यामुळे सैल झालेली स्किन टाईट होईल. शिवाय टवटवीत छान नैसर्गिक चमक येईल.

आठवड्यातून केसांना किती वेळा तेल लावावे? 'या' पद्धतीने तेल लावल्यास मिळेल पोषण; केस होतील दाट इतके की..

वृद्धत्वाची चिन्हे कमी होतील

प्रदूषण, पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली, ताणतणाव यामुळे लहान वयातच स्किनवर सुरकुत्या पडू लागतात. ज्यामुळे आपण कमी वयात वयस्कर दिसू लागतो. चेहऱ्याच्या नियमित मसाजामुळे सुरकुत्या, बारीक रेषा, काळे डाग आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. मसाज केल्याने रक्ताभिसरण तर वाढतेच, यासह कोलेजनचे उत्पादनही वाढते.

त्वचा डिटॉक्सिफाय

रात्री झोपण्यापूर्वी नियमित चेहऱ्याचा मसाज केल्याने त्वचेचे डिटॉक्सिफिकेशन तर होतेच. शिवाय आतूनही क्लिन होते. नियमित मसाज केल्याने त्वचेवरील घाण, तेल, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स साफ होण्यास मदत होते.

कमी वयात पांढऱ्या केसांमुळे त्रस्त? 'या' तेलात शिजवा मेथी दाणे; केस होतील काळेभोर-दाट

फेशिअल मसाजसाठी या तेलाचा करा वापर

रात्री झोपण्यापूर्वी मसाज करण्यासाठी आपण खोबरेल तेल, बदामाचे तेल, कोरफडीचे जेल आणि मध वापरू शकता. नियमित मसाज केल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात. मात्र, मसाज करताना हलक्या हाताने हळुवारपणे मसाज करा. जेणेकरून तेलातील गुणधर्म त्वचेला मिळतील.

Web Title: Facial Massage for Skin Tightening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.