Join us  

चमकदार त्वचा हवी? मग चेहरा करा रिलॅक्स!- मीरा राजपूत सांगतेय खास फेस मसाज टिप्स !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 4:11 PM

Beauty tips: फिट राहण्यासाठी व्यायाम करता ना मग तसाच व्यायाम आता तुमच्या चेहऱ्याची त्वचा फिट (skin tightning) रहावी म्हणूनही करा.. बघा अभिनेता शाहिद कपूर याची बायको मीरा राजपूत (Mira Rajput Kapoor) हिने सांगितलेल्या या फेस मसाज टिप्स...

ठळक मुद्देचेहऱ्याची त्वचा टाईट रहावी, सैल पडून ती सुरकुतलेली दिसू नये, यासाठी अशा पद्धतीने चेहऱ्याला मसाज करणं खूप गरजेचं आहे.

आपण जर नियमित व्यायाम केला नाही तर आपली त्वचा सैलसर पडत जाते... दंड, मांड्या, पोटऱ्या या ठिकाणी सैल पडलेली त्वचा लगेच दिसून येते. याउलट जर नियमित स्ट्रेचिंग करून व्यायाम केला तर त्वचा आणि आपले स्नायू टोन्ड राहण्यास मदत होते. असंच काहीसं आपल्या चेहऱ्याच्या (home remedies for skin tightning) त्वचेचंही आहे. व्यायामाची गरज जशी आपल्या शरीराला असते, तशीच ती आपल्या चेहऱ्यालाही आहे. चेहऱ्याचा व्यायाम (best solution for anti aging) नेमका कसा असावा आणि कधी व कसा करावा, याविषयी अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor's wife) याची बायको मीरा राजपतू (Facial massage tips by Mira Rajput Kapoor) हिने काही ब्यूटी टिप्स शेअर केल्या आहेत.

 

मीरा राजपूत सोशल मिडियावर खूप ॲक्टीव्ह असते. ती अभिनेत्री नसली तरी सोशल मिडियावरचे तिचे फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. यावरून तिची लोकप्रियता दिसून येते. मीराने इन्स्टाग्रामवर (instagram) नुकतेच एक रिल (reel by Meera Rajput) शेअर केले आहे. यामध्ये तिने चेहऱ्याचा व्यायाम कसा असावा याविषयी माहिती दिली आहे. चेहऱ्याची त्वचा टाईट रहावी, सैल पडून ती सुरकुतलेली दिसू नये, यासाठी अशा पद्धतीने चेहऱ्याला मसाज करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वय वाढल्याच्या खाणाखूणा अकाली चेहऱ्यावर दिसू नयेत, असं वाटत असेल तर मीराने सांगितलेला हा सोपा फेस मसाज करून बघायला काहीच हरकत नाही. 

चेहऱ्याला फेस मसाज करण्याचे फायदेBenefits of face massage- चेहऱ्याच्या भागात रक्ताभिसरण व्यवस्थित व्हावे यासाठी फेस मसाज आवश्यक ठरते.- रक्ताभिसरण व्यवस्थित असेल तर त्वचेवरचा ग्लो टिकून राहण्यास मदत होते.- नियमित फेस मसाज केल्यामुळे त्वचा सैलसर आणि लटकलेली दिसत नाही.- स्किन टाईटनिंग होऊन त्वचेवर सुरकुत्या दिसू नयेत यासाठी फेस मसाज नियमितपणे करावे.- फेस मसाज केल्यामुळे तिथली त्वचा रिलॅक्स होते आणि मग ती अधिक चमकदार, तजेलदार दिसू लागते.

 

स्किन टाईटनिंगसाठी कसं करायचं फेस मसाज how to do face massage for glowing skin and wrinkle free face- फेस मसाज करण्यापुर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या.- यानंतर तुमच्या आवडीचं फेस मसाज ऑईल घ्या. फेस मसाज करण्यासाठी सिरम किंवा फेस मसाज ऑईल वापरावे. मॉईश्चरायझर वापरू नका.- सगळ्यात आधी तर तेल दोन्ही हातांच्या बोटांना लावा आणि बोटांनी दोन्ही गालांवर गोलाकार दिशेने मालिश करा.- क्लॉकवाईज, ॲण्टी क्लॉकवाईज अशा दोन्ही दिशेने मसाज करा.- त्यानंतर दोन्ही हातांची बोटे तुमच्या हनुवटीजवळ घ्या. तिथून वर करत कानापर्यंत न्या. असं करताना बोटांनी चेहऱ्यावर थोडं  प्रेशर देण्याचा प्रयत्न करा. ही पद्धत ५ ते ६ वेळा रिपिट करा.

- यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यावर तेल घ्या आणि त्याने तुमच्या गळ्याची मसाज करा. गळ्याची मालिश करताना हात छातीकडून हनूवटीकडे न्यावेत. असं करताना हाताने तेथील त्वचेवर थोडा दाब देण्याचा प्रयत्न करावा. ७ ते ८ वेळा गळ्याला अशा पद्धतीने  मसाज करावी.- यानंतर कपाळाची मसाज करा. यासाठी दोन्ही हातांच्या बोटांना लावा आणि बोटांनी कपाळावर गोलाकार दिशेने मालिश करा.- यानंतर हातांचे दोन्ही अंगठे हनुवटीच्या खाली लावा. हाताचे पहिले बोट हनुवटीच्या वर ठेवा आणि हनुवटी ते कान अशा जॉ लाईनला मसाज करा.

- यानंतर दोन्ही हाताची बोटे डोक्यावर ठेवा. अंगठे नाकाचे जे हाड आहे, त्यावर दोन्ही बाजूने ठेवा. आता डोळयांच्या खालचे जे हाड आहे त्यावर अंगठ्याने दाब द्या. नाकाचे हाड ते कानाच्या वरपर्यंत अशी दोन्ही बाजूने मसाज करा. - सगळ्यात शेवटी कानांना तेल लावा आणि कानाचीही मसाज करा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समीरा राजपूतसेलिब्रिटीत्वचेची काळजी