आर्टिफिशियल ,फॅशनेबल दागिने दिसायला खूपच आकर्षक असतात. जास्तीत जास्त लोक आर्टिफिशियल ज्वेलरी वापरणं पसंत करतात. अलिकडेच आर्टिफीशियल ज्वेलरीचा क्रेझ खूप पाहायला मिळतो. कारण त्यात आपल्याला खूप ऑपशन्स मिळतात. आर्टिफिशियल ज्वेलरी रोज वापरल्यानं त्वचेशी निगडित समस्या जसं की सूज येणं, रॅशेज, गाठ होणं, ड्राय पॅचेच याचा त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणूच तुम्ही रोज आर्टिफिशियल ज्वलेरी वापरणं टाळायला हवं. आज या लेखात आर्टिशिफियल ज्वेलरीमुळे त्वचेला होणारा त्रास टाळण्यासाठी काय करता येईल याबाबत सांगणार आहोत. डर्मेटोलॉजिस्ट डॉ देवेश मिश्रा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.
आर्टिफिशियल दागिने घातल्याने त्वचेच्या समस्या का होतात?
१) अनेकांना मेट्लशी एलर्जी असते. आर्टिफिशियल ज्वेलरी निकलसारख्या धातूंपासून बनवल्या जातात त्यामुळे रोगप्रतिराकशक्ती एलर्जीशी लढू शकत नाही परिणामी इन्फेक्शन वाढत जातं.
२) जर एकदा तुमच्या त्वचेवर आर्टिफिशियल दागिन्यांची रिएक्शन किंवा संसर्ग झाला असेल तर नंतर पुन्हा जेव्हाही तुम्ही असे दागिने वापराल तुम्हाला एलर्जी होऊ शकते.
३) आर्टिफिशियल दागिने ओले झाले तरी ते तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. जर तुमच्या घरात एखाद्याला दागिन्यांची एलर्जी असेल तर तुम्हालाही होऊ शकते.
४) तुमच्या त्वचेवर एलर्जी आर्टिफिशियल दागिने घातल्यानंतर २४ ते ४८ तासांच्या आत येऊ शकते आणि ॲलर्जीक रिएक्शन दोन ते चार आठवडे टिकू शकतात.
आर्टिफिशियल दागिन्यांच्या वापरानं कोणत्या समस्या उद्भवतात?
1) त्वचेवर सूज येणे (Swelling)
आर्टिफिशियल दागिन्यांमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. सूज आल्यावर तुम्ही बर्फानं शेकू शकता, यामुळे वेदना आणि सूज दूर होईल.
2) स्किन रॅशेज होणं (Rashes)
खोटे दागिने घातल्यानं पुरळ येऊ शकते. खोटे कानातले, अंगठ्या, कडे अशा दागिन्यांमुळे त्वचेवर इन्फेक्शन होऊ शकतं. अशी समस्या उद्भवल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
३) गाठ येणं (Lumps)
खोटे दागिन्यांमुळे त्वचेवर गाठी येतात होतात. जर तुम्ही दागिने स्वच्छ न करता वापरत असाल तर त्वचेवर कोणत्याही ठिकाणी बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे एलर्जीक रिएक्शन येऊ शकते.
३) खाज येणं (Itching)
अशा दागिन्यांमुळे त्वचेला खाज येऊ शकते. पावसाळ्यात खाज सुटण्याची समस्या वाढते, म्हणून पावसाळ्यात खोटे दागिने घालणं पूर्णपणे टाळा.
४) त्वचेवर ड्राय पॅच येणं (Dry patches)
अनेकांना खोटे दागिने घातल्याने त्वचेवर कोरडे डाग तयार होतात. जे दागिन्यांची रिएक्शन असल्याचे दर्शवते. जर तुमची त्वचा संवेदनशील किंवा कोरडी असेल तर तुम्ही खोटे दागिने वापरणं टाळा.
उपाय
आर्टिफिशियल दागिन्यांवर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे अशाप्रकारचे दागिने वापरणं टाळा.
त्वचेला डिसइंफेक्टेंट्सनं स्वच्छ करा आणि एंटी फंगल किंवा एंटी बॅक्टेरियल क्रिमचा वापर तुम्ही करू शकता.
आर्टिफिशियल कानातले वापरून इन्फेक्शन झालं असेल तर लिंबाची बारिक काडी कानात घालून ठेवू शकता.
आर्टिफिशियल ज्वेलरीनं इंफेक्शन झाल्यास त्वचेवर तुम्ही एलोवेरा जेल लावू शकता. एलोवेरा जेलमध्ये एंटी इंफ्लामेटरी, एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुणधर्म असतात.
दागिन्यांमुळे इंफेक्शन झाल्यास तुम्ही त्वचेवर हळद लावू शकता. हळदीनं त्वचेवरील इंन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.