चेहरा बरंच काही सांगतो. पण कधी कधी चेहेरा जे सांगतो ते खरंच असतं असं नाही. म्हणजे आपलं वय आहे कमी पण चेहेरा मात्र आपलं वय जास्त सांगतं . असं होतं कारण चेहेर्यावरची चरबी . त्यामुळे चेहेर्यावरील चरबी घटवणं हा महत्त्वाचा उपाय ठरतो.
Image: Google
चेहर्यावरची चरबी घटवण्यासाठी, डबल चीनच्या समस्येत फेस योग, मंचिंग सारखे उपाय आहेतच. पण या उपायांना आणखी काही घरगुती उपायांची जोड दिल्यास चेहेरा चांगला शेपमधे तर येतोच शिवाय पचन क्रिया सुधारण्यासही मदत होते. चेहेर्यावरची चरबी घटली की चेहरा आकर्षक दिसतो आणि चेहेर्यावरची फीचर्स आणखी रेखीव दिसतात. बडीशेप आणि खडीसाखर एकत्र करुन खाणे, हिरवी वेलची खाणे हे दोन यासाठीचे सोपे उपाय आहेत. यासाठी विशेष काहीही मेहनत घ्यावी लागत नाही.
Image: Google
बडीशेप आणि खडीसाखर
जेवण झाल्यानंतर बडीशेप आणि खडीसाखर खाल्ली जाते. जेवणानंतर गोड खावंसं वाटतं. गोड खाण्याचा हा मोह शांत करण्यासाठी बडीशेप आणि खडीसाखर हा उत्तम उपाय आहे. हा उपाय चेहर्यावरची चरबी कमी करण्यासाठीही लागू पडतो. यासाठी जेवणानंतर चार पाच खडीसाखरचे दाणे घ्यावेत आणि त्यात एक चमचा बडीशेप घालून ते खावं. ते लगेच चावून गिळून टाकलं असं करु नये. तर बडीशेप आणि खडीसाखर चांगली चावून चावून खावी. जितक्या जास्त वेळ बडीशेप चावता येईल तेवढा वेळ चावावी. दिवसातून आपण किमान चार वेळा खातोच. प्रत्येक खाण्यानंतर बडीशेप आणि खडीसाखर चावून खाण्याची सवय लावावी. यामुळे गालांचा व्यायाम होतो तसेच डबल चिनची समस्याही दूर होते.
Image: Google
दोन वेलचीचा उपाय
अंगात आळस असला की चरबी वाढतेच. चरबी वाढली की शरीराचं चलनवलन आणखीनच थंड होतं. याचा परिणाम पचनावर होतो. चेहराही सूजलेला किंवा सूस्त दिसतो. हा लूक घालवण्यासाठी तसेच बिघडलेलं पचन सुधारण्यासाठी वेलची हा चांगला उपाय आहे.
दोन वेळेच्या जेवणानंतर किंवा जेव्हा कधी मूड असेल तेव्हा एक वेलची तोंडात टाकावी आणि ती सावकाश चावावी. ती फटाफट चावून गिळल्यास अपेक्षित फायदे मिळणार नाहीत. एकदा वेलची तोंडात टाकली की ती किमान अर्धा तास आणि कमाल एक तास तरी चावायला हवी हे ठरवूनच टाकायचं. एका वेळी एकच वेलची खावी. वेलची खाण्याच्या या कृतीमुळे सतत तोंडाची हालचाल होते. वेलची चावताना जो रस तोंडात तयार होतो तो पोटात जावून पचनाची समस्या दूर करतो.
सुंदर आणि आकर्षक चेहर्यासाठी हे दोन सुगंधी पर्याय किती सोपे आणि छान आहेत ना, करुन बघा!