Lokmat Sakhi >Beauty > घरात ‘या’ कडू बिया आहेत का? केस गळणं, चेहऱ्यावरचे डाग होतील छूमंतर छू..

घरात ‘या’ कडू बिया आहेत का? केस गळणं, चेहऱ्यावरचे डाग होतील छूमंतर छू..

मेथीचे दाणे कडू म्हणत आपण कधीमधी फोडणीत वापरतो तेवढेच, पण सौंदयोपचारात त्यांचं महत्व मोठं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:03 PM2021-06-11T16:03:58+5:302021-06-11T16:09:09+5:30

मेथीचे दाणे कडू म्हणत आपण कधीमधी फोडणीत वापरतो तेवढेच, पण सौंदयोपचारात त्यांचं महत्व मोठं आहे.

fenugreek beauty benefits you should know, DIY, for beautiful hair | घरात ‘या’ कडू बिया आहेत का? केस गळणं, चेहऱ्यावरचे डाग होतील छूमंतर छू..

घरात ‘या’ कडू बिया आहेत का? केस गळणं, चेहऱ्यावरचे डाग होतील छूमंतर छू..

Highlightsसौंदर्योपचारातही मेथी आणि मेथ्यांचा उपयोग होतो.

डॉ. निर्मला शेट्टी

कडूसर चवीची मेथी हे तर मेथीचं वैशिष्ट्य आहेच पण मेथीमध्ये अनेक औषधी गुणही आहेत. मेथीच्या पानांसोबतंच मेथीचं बी ज्यांना मेथ्या म्हणून ओळखलं जातं त्याही अनेक आजारांमध्ये औषध म्हणून उपयोगी पडतात. मेथीचा उपयोग ताप उतरण्यासाठी होतो. पोटाच्या तसेच श्वसनाच्या विकारातही मेथीचा उपयोग होतो. मेथीमध्ये खनिजं आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणूनच मेथी आणि मेथ्यांचा उपयोग खाण्यासोबतचं इतर अनेक कारणांसाठीही होतो.
सौंदर्योपचारातही मेथी आणि मेथ्यांचा उपयोग होतो. विशेषत: केसांच्या समस्यांसाठी मेथीचा उपयोग केल्यास फायदा होतो. तसेच अंगाला येणारी घामाची दुर्गंधी आणि मुखदुर्गंधी घालवण्यासाठी मेथीच्या पानाचा उपयोग खूपच फायदेशीर ठरतो. यासोबतच मेथीच्या भाजीमुळे बाळांतिणीच्या दुधातही वाढ होते. खरंतर मेथीच्या भाजीमध्ये तिच्या चवीसोबत इतके गुण आहेत की ती अनेकांच्या आवडत्या भाज्यांच्या लिस्टमध्ये म्हणूनच असते.


 
मेथीची पानं आणि नारळ


कोरड्या आणि गळणाऱ्या केसांना मऊसूत करण्यासाठी एक कप मेथीची पानं आणि एक कप किसलेलं खोबरं घ्यावं. दोन्हीही एकत्र वाटून त्याचा रस काढावा. हा रस केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. पंधरा मिनिटानंतर केस धुवावेत.

 

 मेथी आणि गूसबेरी


काळ्याभोर केसांसाठी एक कप ताजी मेथीची पानं आणि चार ते पाच गूसबेरी घ्याव्यात. दोन्हीही एकत्र वाटून त्याचा रस काढावा. आणि तो केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. रस लावल्यानंतर साधारणत: पाऊण तासानं केस धुवावेत.
जर मेथीसोबत इतर कोणतीही गोष्ट वापरायची नसेल तर नुसती मेथ्यांची पानं रगडून त्यांचा रस काढून केसांना लावला तरी केसांना चांगला फरक पडतो.

मेथ्यांचा रस


केसांना सतत कलर केल्यामुळे केस निर्जीव आणि शुष्क होतात. यासाठी पावकप मेथ्या रात्रभर भिजत घालाव्या. थोडं पाणी टाकून मेथ्या वाटाव्या. सुती कापड वापरून मेथ्यांचा रस गाळून घ्यावा. मेथ्यांचा रस केसांना मसाज करत लावावा. आणि साधारणत: पाऊण तासानं केस धुवावेत.

मेथी आणि तुळस


चेहऱ्यावरच्या मुरूम आणि पुटकुळ्यांसाठी पाव कप मेथीची पानं आणि पाव कप तुळशीची पानं घ्यावीत. दोन्ही एकत्र वाटून त्याची पेस्ट करावी. आणि ही पेस्ट चेहेऱ्याला लावावी. ही पेस्ट त्वचेला संसर्ग झालेल्या ठिकाणी लावल्यास त्यावरही फरक पडतो.

Web Title: fenugreek beauty benefits you should know, DIY, for beautiful hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.