Lokmat Sakhi >Beauty > केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट

केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट

Fenugreek Seeds for Hair: Benefits and Uses : केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्याचा सोपा उपाय, आता कंगव्यात केसांचा झुपका येणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 11:30 AM2023-11-18T11:30:47+5:302023-11-18T11:35:02+5:30

Fenugreek Seeds for Hair: Benefits and Uses : केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्याचा सोपा उपाय, आता कंगव्यात केसांचा झुपका येणार नाही..

Fenugreek Seeds for Hair: Benefits and Uses | केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट

केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट

सध्या अनेक जण केस गळती (Hair fall) आणि टक्कल पडण्याच्या समस्येने त्रस्त आहे. पण ही समस्या सामान्य होत चालली आहे. केस गळती, केसात कोंडा, केस पांढरे होणे या कारणांमुळे केस आणखी खराब आणि निर्जीव होतात. काही वेळेला टक्कल पडेल की अशीही भीती निर्माण होते. केसांची वाढ शिवाय, केस गळती थांबावी यासाठी बरेच जण विविध उपाय करून पाहतात. तर काही केमिकल प्रॉडक्ट्सचा (Hair fall Products) वापर करतात. पण आपण घरगुती मेथी दाण्याच्या वापराने केसांची गळतीवर उपाय करू शकता.

मेथी दाण्यामध्ये (Fenugreek Seeds) असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड केसांना आतून पोषण देतात. याशिवाय यामध्ये लेसिथिन देखील आढळते, जे केसांना मजबूत करतात. त्यामुळे सैल झालेली केसांची मुळं आणखी घट्ट होतात. शिवाय केसांची नवीन वाढ होते(Fenugreek Seeds for Hair: Benefits and Uses).

केसांसाठी मेथी आणि तिळाच्या तेलाचा सोपा उपाय

साहित्य

पुदिना

आलिया भटसारखा ग्लो चेहऱ्यावर हवा, कच्चे दूध-गुलाबजल-खोबरेल तेल-कोरफडीचा १ उपाय- फक्त १ मिनिटांच

तिळाचे तेल

मेथी दाणे

कृती

एका वाटीत तिळाचे तेल घ्या, त्यात पुदिन्याची काही पानं आणि मेथी दाणे घाला. मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा, व तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. कोमट झालेलं तेल केसांच्या मुळांना लावा. ५ ते ६ तासानंतर केस शाम्पूने धुवा. तिळाचे तेल, पुदिना आणि मेथी दाण्यांमुळे स्काल्पवरील बॅक्टेरिया निघून जातात. शिवाय केसांच्या मुळांना पोषण मिळते. ज्यामुळे केसांची नवीन वाढ होते.

काखेतला काळेपणा वाढला, स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? ५ रुपयांच्या तुरटीचे २ भन्नाट उपाय, त्वचा उजळेल

तिळाच्या तेलाचे फायदे

तिळाचे तेल ओमेगा - ३ आणि ओमेगा - ६ फॅट्स सारख्या पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमध्ये समृद्ध आहे. जे केसांच्या वाढीस मदत करतात. ज्यामुळे केसातील कोंडा, कोरडेपणा, पांढरे केस आणि केस गळतीची समस्या कमी होते.

Web Title: Fenugreek Seeds for Hair: Benefits and Uses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.