Lokmat Sakhi >Beauty > केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? १ चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल 

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? १ चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल 

Fenugreek Seeds for Hair : केसांची वाढ होण्यापासून पांढरे केस कमी होण्यापर्यंत अनेक समस्यांवर मेथी गुणकारी ठरते. (How to make methi hair oil)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:49 AM2023-04-07T11:49:55+5:302023-04-07T16:20:17+5:30

Fenugreek Seeds for Hair : केसांची वाढ होण्यापासून पांढरे केस कमी होण्यापर्यंत अनेक समस्यांवर मेथी गुणकारी ठरते. (How to make methi hair oil)

Fenugreek Seeds for Hair : Fenugreek Seeds hair oil for hair fall control hair loss control tips | केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? १ चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल 

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? १ चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल 

केस खूपच गळतात, विंचरताना तुटतात अशा तक्रारी बऱ्याच जणांच्या असतात गळणाऱ्या केसांवर उपाय करण्यासाठी काहीही करण्याची महिलांची तयारी असते. केमिकल्सयुक्त उत्पादनं, हिटींग टुल्सचा वापर यामुळे केस जास्त गळतात. केस गळणं रोखण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (Hair Fall Control Tips) त्यापैकीच एक म्हणजे मेथी. मेथीचे सेवन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. शरीराप्रमाणेच केसांसाठीही मेथी फायदेशीर आहे.  केसांची वाढ होण्यापासून पांढरे केस कमी होण्यापर्यंत अनेक समस्यांवर मेथी गुणकारी ठरते. (How to make methi hair oil)

मेथीचा हेअर स्प्रे कसा बनवायचा?

मेथीचा हेअर स्प्रे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक ग्लास पाणी गरम करून घ्या. त्यात १ चमचा मेथीचे दाणे घाला. त्यात १ चमचा ब्लॅक सिड्स तेल घाला. हे तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यावर एका स्वच्छ भरणीत भरा. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास तुम्हाला केसांमध्ये फरक जाणवेल. केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

मेथीचे केसांना फायदे

1) केसांना वाढण्यासाठी प्रोटीनची गरज असते. मेथीच्या दाण्यांपासून सीरम तयार करून केसांना लावू शकता. यासाठी मेथीचे दाणे बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर त्यात मोहरीचे तेल किंवा जोजोबा तेल मिसळून ठेवावे. आता हे सीरम केसांना लावा.

चेहरा वयस्कर दिसतो? ३ पदार्थांचा घरगुती फेसपॅक लावा; सुरकुत्या, डार्क सर्कल्स येणारच नाही

2) मेथीचा हेअर पॅक केसांसाठी खूप आरोग्यदायी आहे. हा पॅक बनवण्यासाठी मेथीचे दाणे बारीक करून त्यात अंडी घालून पॅक तयार करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात दहीही घालू शकता. त्यानंतर हा हेअर पॅक केसांना लावा आणि अर्धा तास तसाच राहू द्या. नंतर आपले केस कोमट पाण्याने धुवा आणि नंतर शॅम्पूनं धुवा.

फक्त ५ रुपयात पांढरे केस करा काळेभोर; १ घरगुती उपाय, ६ महिने पिकणार नाही केस

3) मेथीची पेस्ट केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या वापरामुळे तुमचे केस दाट दिसू शकतात आणि केस वाढवण्यास मदत होते. ही पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मेथीचे दाणे भिजवून रात्रभर ठेवावे लागतील. त्यानंतर सकाळी बारीक करून केसांना लावा. 

Web Title: Fenugreek Seeds for Hair : Fenugreek Seeds hair oil for hair fall control hair loss control tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.