Join us  

पांढऱ्या केसांमुळे वय जास्त दिसू लागलं? खोबरेल तेलात मिसळा ५ रुपयाची १ 'साधी' गोष्ट; केस होतील दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 10:00 AM

Fitkari and Coconut oil benefits for Hair : खोबरेल तेलात तुरटी मिसळा, केसांमध्ये दिसतील ३ आश्चर्यकारक फरक

आजकाल प्रत्येक व्यक्ती केसांच्या समस्येने त्रस्त आहे (Hair care). केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे या समस्या सामान्य आहेत. केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण विविध प्रकारच्या ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो (Coconut oil for hair). पण बऱ्याचदा या उपायांमुळे केसांचे अधिक नुकसान होऊ शकते (Home remedy). त्यामुळे केसांवर कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

ब्यूटी ट्रिटमेण्ट घेण्याऐवजी आपण खोबरेल तेलाने देखील केसांच्या समस्या सोडवू शकता. खोबरेल तेलातील गुणधर्म वाढवण्यासाठी आपण त्यात तुरटी देखील मिक्स करू शकता. तुरटीमुळे केसांच्या समस्या सुटतात, शिवाय केसांवर नवी चमक येते(Fitkari and Coconut oil benefits for Hair).

केसांवर खोबरेल तेल आणि तुरटीचा वापर कसा करावा?

सर्वात आधी खोबरेल तेल घ्या, त्यात तुरटी पावडर मिसळा. किंवा तुरटीचा खडा फिरवा. आपण हे तेल स्काल्प आणि केसांच्या टोकापर्यंत लावून मसाज करू शकता.

खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावल्यास केसांना कोणते फायदे होतात?

किडनी स्टोन असेल तर 'हे' ४ पदार्थ खाणे टाळावेत, धोका वेळीच टाळा

स्काल्प होते क्लिन

केस गळणे रोखण्यासाठी खोबरेल तेल आणि तुरटी फायदेशीर ठरू शकते. खोबरेल तेलात ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मासह, ॲंटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे स्काल्प क्लिन होईल, केसांची योग्य वाढ होते. यासाठी आठवड्यातून किमान खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा.

पांढरे केस

जर आपले कमी वयात केस पांढरे झाले असतील तर, केसांच्या मुळापर्यंत खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा. यातील गुणधर्मामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळेल. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होईल.

दाताला ब्रेसेस लावल्या? ४ गोष्टी खाणं टाळा; दात किडतील - दुखणं वाढेल

डेड स्किन

खोबरेल तेल आणि तुरटी दोन्ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत.  यात केसांना लागणारे आवश्यक पोषक घटक आहेत. ज्यामुळे स्काल्प क्लिन होते. कोंडा आणि डेडस्किनही दूर होते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स