Join us  

नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 9:56 AM

Five Genius Uses Of Coconut Shells : नारळाच्या सालीचा वापर करून तुम्ही घरातील अनेक कामं सोपी करू शकता.  

भारतीय घरांमध्ये नारळाचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. पूजेच्या कामात असो किंवा स्वंयपाकासाठी असो ओल्या नारळाशिवाय कोणतंच काम होत नाही. (Main Uses Of Coconut Shells)ओल्या नारळाने पदार्थाला चव येते. (Narlachya Saliche Fayde)डाळीत, भाजीत किंवा गोड पदार्थांत आवर्जून ओलं नारळ घातलं जात. नारळ फोडल्यानंतर त्याची सालं काढून फेकली जातात. (Five Amazing Uses Of Coconut Shell)नारळाच्या सालीचा वापर करून तुम्ही घरातील अनेक कामं सोपी करू शकता.  नारळाच्या शेंड्यापासून कोणकोणती कामं सोपी होऊ शकतात पाहूया. (What are the benefits that can be used from coconut shells)

खत तयार करता येते

खताच्या स्वरूपात वापर करा. नारळाच्या शेंड्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. नारळ सोलून तुम्ही कुंडीत किंवा बागेत बारीक करून घालू शकता. यामुळे  बाहेरतील रोपांची वाढ चांगली होईल. (Narlachya saliche fayde in marathi) 

दातांचा पिवळेपणा दूर करता येतो

दातांवर पिवळा थर जमा झाला असेल तर नैसर्गिक उपायांनी हा थर काढून टाकता येतो. नारळाच्या सालीचा वापर करून तुम्ही दात चमकवू शकता.  यासाठी नारळाची सालं जाळून त्याची पावडर बनवून घ्या. या  पावडरने दात घासा. यामुळे दात मोत्यांसारखे चमकू लागतील.

मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस

साफ सफाईसाठी वापर करा

नारळाच्या सालीचा वापर तुम्ही स्क्रबरप्रमाणे करू शकता.  ही सालं वेगवेगळी करून एक पॅडप्रमाणे आकार तयार करून घ्या.  नंतर डिश वॉशच्या मदतीने भांडी स्वच्छ करून घ्या. पर्यावरणासाठी  हे उत्तम ठरेल. यातून दुर्गंधही येणार नाही.

केस काळे होतात

हा एक पारंपरिक उपाय आहे. नारळाच्या सालीचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता. यासाठी एका लोखंडाच्या कढईत नारळाची सालं जाळून घ्या. ही सालं जाळून त्यात नारळाचे किंवा राईचे तेल मिसळून केसांना ब्रशच्या मदतीने लावा. हे मिश्रण एखाद्या नॅच्युरल डायप्रमाणे काम करते. 

पोटाच्या टायर्समुळे अख्खं शरीर बेढब झालंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, आपोआप सपाट होईल पोट

नॅचरल फ्रेशनर तयार करू शकता

भारतीय घरांमध्ये नारळाच्या  सालीचा  वापर घरात सुंगध निर्माण करण्यासाठी केला जातो.  नारळाच्या साली बरोबर कापूर ठेवून जाळल्याने घरातील दुर्गंध कमी होतो आणि डासांना पळवून लावण्यासही मदत होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी