Lokmat Sakhi >Beauty > चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल

चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल

Five Home Remedies for Dark Circles (Dark Circle kase ghalvayche) : वाढत्या वयात या समस्येकडे लक्ष दिले नाही चेहरा खराबही होऊ शकतो. कारण डार्क सर्कल्समुळे चेहरा वयाआधीच म्हातारा झाल्यासारखा दिसू लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:05 PM2023-12-13T16:05:31+5:302023-12-13T20:57:52+5:30

Five Home Remedies for Dark Circles (Dark Circle kase ghalvayche) : वाढत्या वयात या समस्येकडे लक्ष दिले नाही चेहरा खराबही होऊ शकतो. कारण डार्क सर्कल्समुळे चेहरा वयाआधीच म्हातारा झाल्यासारखा दिसू लागतो.

Five Home Remedies for Dark Circles : Easy Ways to Get Rid From Dark Circles | चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल

चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल

आपण चेहऱ्याची जशी काळजी घेतो तसंच डोळ्याची काळजी घेणंही महत्वाचे असते. जास्त वेळ स्क्रिन समोर बसून काम करणं, झोप कमी होणं डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येतात. (Five Home Remedies for Dark Circles ) डार्क सर्कल्स  येणं काही नवीन नाही महिला मेकअपच्या साहाय्याने  डार्क सर्कल्स लपवतात. वाढत्या वयात या समस्येकडे लक्ष दिले नाही चेहरा खराबही होऊ शकतो. कारण डार्क सर्कल्समुळे चेहरा वयाआधीच म्हातारा झाल्यासारखा दिसू लागतो. (Dark Circles Home Remedies)

थंड दूध 

फार्म इजीच्या रिपोर्टनुसार थंड दूध एक नॅच्युरल क्लिंजर असून डोळ्यांखालची काळी वर्तूळ काढून टाकण्याचा एक प्रभावी उपाय आहे. थंड दूधात लॅक्टिक एसिड असते ज्यामुळे पफिनेस कमी होतो. यातील पोटॅशियम त्वचेला मॉईश्चराईज राहण्यास मदत करतो.  थंड दूधात एक कॉटन बॉल बुडवून २० ते ३० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. काही दिवसातंच तुम्हाला फरक जाणवेल.

गुलाब पाणी

गुलाब पाणी नियमित त्वचेवर लावल्याने डार्क सर्कल्स  कमी होण्यास मदत होते. गुलाब पाण्यात कापूस बुडवून  डोळ्यांवर कमीत कमी २० मिनिटांसाठी ठेवा रोज सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करा. या उपायाने डार्क सर्कल्स कमी होतील आणि चेहऱ्यावर तेज येईल.

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

मध आणि लिंबाचा रस

मध आणि लिंबाचा रस मिसळून डोळ्यांखाली लावा त्यानंतर २० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल. 

कच्चा बटाटा

कच्च्या बटाट्याचे काप करून डोळ्यांच्या खाली १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. काही वेळासाठी तसंच ठेवू सुक द्या. त्यानंतर थंड पाण्यान डोळे धुवा. काही दिवसांतच डोळ्यांखालची काळी वर्तूळ दूर झालेली दिसून येतील.

कपाळावरचे केस जास्तच पांढरे दिसून येतात? रोज ५ पदार्थ खा, डाय न लावता काळेभोर होतील केस

एलोवेरा

एलोवेराचा रस डोळ्याच्या खाली लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. तुम्ही एलोवेराचा रस आपल्या चेहऱ्यावरही लावू शकता. एलोवेरा रस लावून चेहरा धुतल्याने चेहरा चमकदार दिसेल. यामुळे चेहरा ताजातवाना  दिसेल आणि ड्रायनेस कमी होईल.

Web Title: Five Home Remedies for Dark Circles : Easy Ways to Get Rid From Dark Circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.