Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? ५ पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? ५ पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

Five Natural Home Remedies For Grey Hair (Piklele kes kale karnyasathi upay): मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते वाटून त्यात आवळ्याचा रस मिसळा हे मिश्रण केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 12:39 PM2023-10-08T12:39:11+5:302023-10-09T19:07:02+5:30

Five Natural Home Remedies For Grey Hair (Piklele kes kale karnyasathi upay): मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते वाटून त्यात आवळ्याचा रस मिसळा हे मिश्रण केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवा.

Five Natural Home Remedies For Grey Hair : Solutions to stop grey hair naturally | डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? ५ पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? ५ पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

केस पांढरे होणं हे अगदी सामान्य आहे. वाढत्या वयात केस पिकायला सुरूवात होते. अनेकांना कमी वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. (How to black white hair naturally) केस पिकले की बरेचजण  केस काळे करण्यासाठी उपलब्ध असलेल्या केमिकल्सयुक्त उत्पादनांकडे वळतात. (Grey Hairs Solution)

केमिकल्सयुक्त डायमुळे केसांवर तात्पुरता काळा रंग दिसून येतो नंतर पुन्हा केस पांढरे झालेले  दिसतात. (Beauty Tips) असं होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय वापरून पाहायला हवेत. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासस मदत होते याशिवाय केसांवर चमकसुद्धा येते. (Grey hair solution without dying)

केसांना काळे करण्यासाठी घरगुती उपाय

केस पांढरे होण्याची अनेक कारणं असू शकतात. जसं की आनुवांशिकता, जास्तवेळ उन्हात राहणं, केसांची व्यवस्थित काळजी न घेणं, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर, जास्त ताण घेणं, खाण्यापिण्यात पोषक तत्वांची कमतरता यामुळे केस पांढरे व्हायला सुरूवात होते. (Effective Home Remedies For Grey Hair)

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे पोषक तत्वांचा भांडार असतात. यातील पोटॅशियम केसांच्या अनेक समस्या दूर करते. यातील इतर गुण केसांना नैसर्गिकरित्या काळे बनवण्यास फायदेशीर ठरतात. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते वाटून त्यात आवळ्याचा रस मिसळा हे मिश्रण केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवा. आठवडाभर हा उपाय केल्याने चांगला फरक दिसून येईल.

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

कढीपत्ता

केसांना काळे करण्यासाठी नारळाचं तेलही परिणामकारक ठरत. हे तेल व्यवस्थित गरम करून डोक्याला मसाज करू शकता. नारळाच्या तेलात कढीपत्ता घालून व्यवस्थित शिजवून घ्या. नंतर  गॅस बंद करून थंड झाल्यानंतर गाळून एका बरणीत भरा.  हे तेल केसांना नैसर्गिकरित्या काळे बनवेल आणि केसांचे गळणे दूर करेल.

पांढरे केस जास्त उगवायला लागले? खोबरेल तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा, मुळापासून केस होतील काळे

भृंगराज

भृंगराज केसांना काळे करण्यासाठी परिणामकारक मानले जाते. एक वाटी भृंगराज तेल किंवा याची पावडर घ्या. भृंगराज पावडरमध्ये पाणी मिसळून याची पेस्ट तयार करा आणि केसांना लावा नंतर केस स्वच्छ धुवून घ्या भृंगराजबरोबर तुम्ही नारळाचे तेल मिसळूनही लावू शकता. 

रोज गळून केस पातळ झाले? सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला दाट केसांसाठी खास उपाय

ब्लॅक कॉफी

पांढरे केस काळे व्हावेत यासाठी तुम्ही ब्लॅक कॉफीचा वापर करू शकता. ब्लॅक कॉफी केसांना काळा रंग देण्यासाठी परिणामकारक ठरते. ब्लॅक कॉफी पाण्यात उकळवून थंड करून घ्या. त्यांतर आवळा पावडर, मेहेंदी पावडरमध्ये मिसळून २० ते  ३० मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवा. या उपायाने केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल.

Web Title: Five Natural Home Remedies For Grey Hair : Solutions to stop grey hair naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.