Lokmat Sakhi >Beauty > रोज लावा दूधाचं स्किन ब्राईटनिंग जेल, एका आठवड्यात कमी दिसतील चेहऱ्यावरच्या सुरकुत्या

रोज लावा दूधाचं स्किन ब्राईटनिंग जेल, एका आठवड्यात कमी दिसतील चेहऱ्यावरच्या सुरकुत्या

Five Ways To Use Raw Milk on Face For Glowing Skin : दूधापासून स्किन ब्राईटनिंग जेल कसं तयार करायचं ते पाहूया.  (How to get glowing skin using milk)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:53 PM2023-07-31T15:53:49+5:302023-08-01T11:09:35+5:30

Five Ways To Use Raw Milk on Face For Glowing Skin : दूधापासून स्किन ब्राईटनिंग जेल कसं तयार करायचं ते पाहूया.  (How to get glowing skin using milk)

Five Ways To Use Raw Milk on Face For Glowing Skin : How to get glowing skin using milk) | रोज लावा दूधाचं स्किन ब्राईटनिंग जेल, एका आठवड्यात कमी दिसतील चेहऱ्यावरच्या सुरकुत्या

रोज लावा दूधाचं स्किन ब्राईटनिंग जेल, एका आठवड्यात कमी दिसतील चेहऱ्यावरच्या सुरकुत्या

(Image Credit- You0Tube Kudrat Care)

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी महिला ब्लिच, फेशियल अशा वेगवेगळ्या पार्लर ट्रिटमेंट्स घेतात. पण त्याचा परीणाम तात्पुरात दिसून येतो आणि पैसेही जातात.  (Five Ways To Use Raw Milk on Face For Glowing Skin) चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि ग्लो मिळवण्यासाठी घरगुती उपाय अधिकाधिक फायदेशीर ठरतात. या उपायानं चेहऱ्यावरचा डलनेस कमी होऊन त्वचा ग्लोईंग दिसेल. दूधापासून स्किन ब्राईटनिंग जेल कसं तयार करायचं ते पाहूया.  (How to get glowing skin using milk)

मिल्क फेस जेल कसे बनवावे

घरगुती स्कीन ब्राईटनिंग जेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ मोठे चमचे कच्च दूध घ्या. दूधात एक चमचा साखर, एक चमचा एलोवेरा हे पदार्थ घालून व्यवस्थित एकजीव करा. हे मिश्रण एका छोट्याश्या बाऊलमध्ये मिक्स करून नंतर चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून ३ वेळा हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यानं त्वचेशी संबंधित समस्या दूर होती आणि त्वचा चमकू (Skin problem)  लागेल. या फेसपॅकमध्ये असलेली साखर त्वचा एक्सफोलिएट करते आणि जेल त्वचेला मऊ, चमकदार बनवते. यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोकाही टळतो. 

१) कच्च दूध कशातही न मिसळता चेहऱ्याला लावल्यानेही त्वचा उजळते. कच्च्या दूधात एक कॉटन पॅड डीप करून चेहऱ्याला लावा. थोडावेळ तसेच ठेवल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेतील धूळ, घाणं निघून  जाईल आणि त्वचा मऊ राहील.

२) तांदळाच्या पिठात कच्च दूध मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्स एक्ने असलेल्या ठिकाणी लावा.  रात्रभर चेहरा तसाच ठेवा. सकाळी उठल्यानंतर हलक्या हातानं चेहरा स्वच्छ धुवा. 

३) टोमॅटोचा रस कच्च्या दूधात मिसळून चेहऱ्याची मसाज करा.  २० ते ३० मिनिटं चेहऱ्याला तसंच लावून ठेवल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवा.

४) कच्च दूध आणि मध एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्याला लावा. २ ते ३ मिनिटं हलक्या  हातानं मसाज करा. नंतर सुकण्यासाठी वेळ द्या. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. या उपायानं त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोईंग दिसेल. एक्ने,  पिंपल्ससारख्या समस्याही उद्भवणार नाहीत.

५) कच्च्या दूधात हळद मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये लावा २ ते ३ मिनिटं मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. हा उपाय तुमच्यासाठी स्किन क्लिनंजर आणि स्किन टोनरप्रमाणे काम करेल.
 

Web Title: Five Ways To Use Raw Milk on Face For Glowing Skin : How to get glowing skin using milk)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.