Join us  

आळशीपणा न करता फक्त १ चमचा आळशीचा करा सोपा उपाय, केस वाढतील जोमात, होतील सिल्की 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2022 4:35 PM

How To Control Hair Fall: केस वाढतच नाहीत, म्हणून मग नाईलाजाने लहानच ठेवावे लागतात, ही तक्रार अनेकींची असते. केसांची वाढ (hair growth) खुंटली असेल तर करून बघा हा एक घरगुती उपाय (hair care tips)

ठळक मुद्देआळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई देखील मोठ्या प्रमाणात असते. शिवाय त्यातील ॲण्टी ऑक्सिडंट्समुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्याही कमी होते.  

लांबसडक, चमकदार केस आता क्वचितच एखादीचे बघायला मिळतात. अर्थात आता मोठे केस मेंटेन होत नाहीत, म्हणून ते कापलेही (how to accelerate hair growth?) जातात. पण तरीही कंबरेएवढे छान सिल्की केस (remedies to reduce frizzy hair) असतील, तर ते अजूनही बऱ्याच जणींना आवडतात. पण बहुतांश जणींची तक्रार हीच असते की केस वाढतच नाहीत. एकदा केस कापले की पुढे कित्येक महिने ते जसेच्या तसेच असतात. अगदी लक्षातही येणार नाही, एवढी मंद गतीने त्यांची वाढ होते. शेवटी मग खालचे केस फाटे फुटून कापावे लागतात आणि मग पुन्हा लांब केसांचं स्वप्न स्वप्नच राहून जातं. (how to make Flax seeds gel for hair growth?)

 

तुमच्याही केसांचं असंच काहीसं झालं असेल, केस खूपच हळू- हळू वाढत असतील तर हा एक घरगुती उपाय करून बघा. कधी कधी केमिकल्स असणारे हेअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी असे नैसर्गिक, घरगुती उपाय अधिक परिणामकारक ठरतात. शिवाय या घरगुती, नैसर्गिक उपचारांचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे या उपायांनी कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे केसांसाठी आळशीच्या बियांचा Flax seeds gel वापर करून बघा. जवसाप्रमाणेच दिसणाऱ्या या बिया आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी असतात. या बियांमधले औषधी गुणधर्म केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. घरच्याघरी या बियांपासून हेअर जेल तयार करा आणि काही दिवस त्याचा नियमित वापर करा. केसांची वाढ तर जोमात होईलच पण केस अधिक सिल्की आणि चमकदार होतील.

 

कसं करायचं आळशीच्या बियांचं हेअर जेल?- यासाठी आपल्याला २ टेबलस्पून आळशीच्या बिया, १ कप पाणी लागणार आहे. तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ॲलोव्हेरा जेल किंवा इसेंशियल ऑईल तुम्ही यात टाकू शकता.

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर... त्वचा दिसेल तरुण- चमकदार- एका कढईमध्ये पाणी आणि आळशीच्या बिया टाका. आणि कढई गॅसवर मंच आचेवर ठेवून द्या. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. पाणी तापत असताना आणि उकळतानाही हे सारखं हलवत रहा. जोपर्यंत पाणी घट्ट जेलसारखं होत नाही, तो पर्यंत तो उकळू द्या. जेव्हा पाण्याला जेलप्रमाणे घट्टपणा येईल, तेव्हा गॅस बंद करा. - हे जेल थंड झालं की ते गाळून घ्या. त्यात तुमच्याकडे उपलब्ध असल्यास १ टीस्पून ॲलोव्हेरा जेल आणि इसेंशियल ऑईलचे ४ थेंब टाका. या दाेन्ही गोष्टी नसतील तरीही चालेल.- आता हे जेल केसांच्या मुळांशी लावा. एक ते दिड तास राहू द्या आणि त्यानंतर केस धुवून टाका. 

 

आळशीचं हेअर जेल वापरण्याचे फायदे (Benefits of Flax seed gel)- स्काल्पला पोषण मिळते. त्यामुळे केसांची वाढ जलद होते.- स्काल्पची पीएच लेव्हल आणि तेलकटपणा दोन्हीही बॅलेन्स होण्यासाठी मदत होते.

सातूचं पीठ फक्त उन्हाळ्यातच खावं असं काही नाही, पावसाळ्यातही खा- सातूच्या पिठाचे ५ फायदे- डोक्याच्या त्वचेमध्ये रक्तप्रवाह वेगवान होतो.- आळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे कोंडाही कमी होतो. केसांची इलॅस्टिसिटी वाढते आणि त्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं.- आळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई देखील मोठ्या प्रमाणात असते. शिवाय त्यातील ॲण्टी ऑक्सिडंट्समुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्याही कमी होते.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी