Lokmat Sakhi >Beauty > ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा ६ सोप्या  टीप्स, स्किन दिसेल कायम ग्लोइंग... 

ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा ६ सोप्या  टीप्स, स्किन दिसेल कायम ग्लोइंग... 

Follow 6 Simple Tips To Get Glowing Skin : रोजच्या रुटीनला थोडस बदलून स्किन ग्लोइंग ठेवण्यासाठी काही खास उपाय...  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 12:24 PM2023-02-04T12:24:11+5:302023-02-04T12:33:38+5:30

Follow 6 Simple Tips To Get Glowing Skin : रोजच्या रुटीनला थोडस बदलून स्किन ग्लोइंग ठेवण्यासाठी काही खास उपाय...  

Follow 6 simple tips to get glowing skin, skin will look glowing forever... | ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा ६ सोप्या  टीप्स, स्किन दिसेल कायम ग्लोइंग... 

ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा ६ सोप्या  टीप्स, स्किन दिसेल कायम ग्लोइंग... 

सुंदर ग्लोइंग त्वचा मिळविण्यासाठी महिला सतत प्रयत्नशील असतात. आपली त्वचा कायम ग्लोइंग राहावी यासाठी त्या अनेक उपाय करतात. परंतु त्वचा ग्लोइंग करण्यासाठी त्वचेची केवळ बाहेरून काळजी घेणे इतकेच महत्वाचे नसते. सुंदर ग्लोइंग स्किन मिळविण्यासाठी आतून म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. स्किन ग्लोइंग ठेवण्यासाठी त्वचेला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैलीत छोटे-छोटे पण सतत बदल करणे आवश्यक आहे. रोजच्या रुटीनला थोडस बदलून स्किन एक्स्पर्ट डॉक्टर बिंदू स्थलेकर यांनी सांगितलेलं उपाय करून आपण त्वचा कायम ग्लोइंग ठेवू शकता(Follow 6 simple tips to get glowing skin). 

ग्लोइंग त्वचा मिळविण्यासाठी स्किन एक्स्पर्ट डॉक्टर बिंदू स्थलेकर सांगत आहेत या सोप्या टीप्स.. 

१. त्वचेला हायड्रेटेड ठेवा :- दिवसभर पाणी पीत राहा, कारण त्वचा चांगली ठेवण्यासाठी आतून हायड्रेटेड राहणे देखील खूप महत्वाचे आहे. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्सही निघून जातात. चांगले आरोग्यदायी ज्यूस प्या. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहते.

२. भरपूर पाणी प्या :- त्वचा आतून चांगली ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिणे केवळ आपल्या आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेसाठी भरपूर लाभदायक असते. आपली त्वचा कायम सुंदर दिसावी, यासाठी कित्येक सेलिब्रिटी मंडळी देखील हा सोपा उपाय फॉलो करतात. कोमट किंवा गरम पाणी पिण्याचे एक नाही असंख्य फायदे आहेत. यामुळे रक्तदाबापासून ते पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. शरीरातील रक्त प्रवाहही वाढतो. या सर्व प्रक्रियांचा आपल्या त्वचेवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.

 

३. त्वचेला क्लिन आणि मॉइश्चराइज करा :- काही वेळा धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव होते. प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे आणि यूवी किरणांच्या संपर्कात आल्याने व्यक्ती निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराइज करणे गरजेचे असते. त्वचेसाठी मॉइश्चरायझर वापरा. आंघोळीनंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावण्याची सवय ठेवा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. त्यामुळे मॉइश्चरायझरचा नियमित वापर करणेही खूप गरजेचे आहे.


dr.bindusthalekar या इंस्टाग्राम पेजवरून त्वचा कायम ग्लोइंग ठेवण्यासाठी ६ उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपली त्वचा कायम ग्लोइंग दिसण्यास मदत होईल. 

४. आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सफॉलिएट करा :- त्वचेतून घाण आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी एक्सफॉलिएटिंग खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींची मदत घ्या. आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रब केल्यास ब्लॅकहेड्स दूर होतात.

५. सनस्क्रीनचा वापर करावा :- चेहऱ्यासाठी सनस्क्रीनचा वापर जरूर करावा. घरातून बाहेर पडताना दररोज सनस्क्रीन लावण्याची सवय ठेवावी. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी २० मिनिटे आधी सनस्क्रीन त्वचेवर लावावे. 

६. त्वचेसाठी व्हिटॅमिन 'सी' सिरमचा वापर करा :- सिरम हे वॉटर बेस्ड असल्यामुळे ते त्वचेमध्ये लवकर शोषले जाते. आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला आतून ओलावा देण्याचे काम फेस सिरम करते. सिरममध्ये अधिक अँटिऑक्सिडन्टंस असतात. ज्यामुळे त्वचेतील उघडी छिद्रे दिसत नाहीत. त्वचा दीर्घकाळ सुंदर राहते. सुरकुत्या येत नाहीत, आणि चेहऱ्याची त्वचा टोन राहते.

Web Title: Follow 6 simple tips to get glowing skin, skin will look glowing forever...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.