Join us  

६ सोप्या स्टेप्स, घराच्याघरी करा झटपट मेनिक्युअर, हात दिसतील खुप सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 5:14 PM

Follow These 6 Easy Steps To Give Yourself A Salon-Like Manicure At Home : आपले हात खडबडीत - रफ होतात त्यासाठी करा सोपा आरामदायी उपाय...

स्त्रिया नेहमीच आपल्या सौंदर्याची खूपच काळजी घेतात. पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सगळंच अगदी अप टू डेट असावं असं प्रत्येकीचं स्वप्न असत. यासाठी स्त्रिया दर महिन्याला आवर्जून पार्लरला जातात. पार्लरला गेल्यानंतर स्त्रिया हातापायांची सुंदरता वाढविण्यासाठी मेनिक्युअर व पेडिक्युअर करतात. हातपायांवरील सुरकुतलेली त्वचा, डेड स्किन, टॅनिंग, हात - पायांवरील काळे डाग, नखांची सुंदरता यांसारख्या असंख्य गोष्टींसाठी मेनिक्युअर व पेडिक्युअर केले जाते. आपल्या हातापायांची शोभा आपल्या बोटांच्या नखांमुळेच असते.अशातच नखांच्या काळजीसाठी आणि आपली नख साफ आणि स्वच्छ रहाण्यासाठी आपण मेनिक्युअर व पेडिक्युअर करतो.  

अनेक स्त्रिया पार्लरमध्ये मेनिक्युअर करतात. जेणेकरून हातांच्या आणि पायांच्या नखांची काळजी घेता येईल. आपले हात सुंदर ठेवण्यासाठी, आठवड्यातून एकदा मेनिक्युअर करणे आवश्यक आहे. पण यासाठी आपल्याला महागड्या पार्लर पॅकेजची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या हातांना घरबसल्या मेनिक्युअरची लक्झरी ट्रिटमेंट देऊ शकता, मग या मेनिक्युअर टिप्स फॉलो करा(Follow These 6 Easy Steps To Give Yourself A Salon-Like Manicure At Home).

घरच्या घरी हातांना मेनिक्युअर करण्याची सोपी पद्धत :- 

१. स्टेप १ :- सर्वप्रथम कापूस आणि नेलपॉलिश रिमूव्हरने नखांवरील जुनी नेलपॉलिश संपूर्णपणे काढून टाकावी. नेलपॉलिश काढण्यासाठी जास्त प्रमाणांत  रिमूव्हरचा वापर करणे टाळा, कारण नेलपॉलिश रिमूव्हरने नखे कोरडी पडतात. तुम्हाला तुमची नखे कापायची असतील तर नेल क्लिपर वापरा. नंतर एमरी बोर्डच्या मदतीने त्यांना अंडाकृती आकार द्या. नखांना आपल्या आवडीनुसार हवा होत शेप द्या. 

२. स्टेप २ :- एका भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्यात हात ५ मिनिटे भिजवून ठेवावेत. या कोमट पाण्यांत आपण शैम्पू, बाथ जेल किंवा गुलाब पाण्याचे  काही थेंब देखील सोडू शकता. भिजवल्यानंतर, नखे स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रश वापरा. कठोर नेल ब्रश वापरू नये. या कोमट पाण्यांत जर आपण शॅम्पू घातला असेल तर त्यामुळे हाताला अधिकचा साबण लागला असेल तर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. 

३. स्टेप ३ :- नखांचे सौंदर्य वाढण्यासाठी तुम्ही नखांना नेल पॅक लावू शकता. नेलपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं गरम पाणी घ्या. त्यानंतर थोडसं कच्च दूध घाला. त्यानंतर त्या पाण्यामध्ये गुलाब जल किंवा गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या तोडून टाका. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही व्हिटॅमिन (Vitamins) ई ची कॅप्सूल वापरू शकता. या सगळ्या मिश्रणाला नखांना मसाज करून थोड्यावेळ तसेच ठेवा. त्यानंतर नेलपॅक कोमट पाण्याने धुऊन टाका. नेलपॅक लावल्याने तुमची नखे डीप क्लीन होतील.

पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडिक्युअर कशाला? घरच्याघरी फक्त १५ मिनिटांत ६ स्टेप्समध्ये करा पेडिक्युअर, पाय दिसतील सुंदर...

४. स्टेप ४ :- कापसाची कळी किंवा कॉटन बड्स घ्या आणि हळुवारपणे क्यूटिकल मागे ढकलून घ्यावे. नखांचे क्यूटिकल काढण्यासाठी मेटल क्यूटिकल पुशर्स वापरणे टाळा, कारण ते त्वचेला इजा करू शकतात. जर क्युटिकल्स मागे चिकटले तर थोडी क्रिम लावा आणि नंतर त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. नखे खालून स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करावा. यासाठी कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये. 

५. स्टेप ५ :- हातांची नखे स्वच्छ करुन घेतल्यानंतर तुम्ही नारळाच्या तेलाने नखांची आणि बोटांची चांगल्या प्रकारे मालिश करुन घ्यावी. हे घटक त्वचा मऊ आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात आणि कोरड्या आणि निस्तेज त्वचेला चमक देतात.

६. स्टेप ६ :- बोटांच्या नखांना मालिश केल्यानंतर सॉफ्ट स्ट्रोक वापरून नेलपेंट लावा. नखांना नेलपेंट लावताना ते केवळ तीन स्ट्रोकमध्येच लावून घ्यावे. प्रथम, ते नखाच्या मध्यभागी आणि नंतर दोन्ही बाजूंनी लावावे. नखं एकसमान पूर्ण पेंट करण्यासाठी पेंटचे दोन कोट लावा. प्रथम, सर्व नखांवर रंगाचा एक कोट लावा. पहिला कोट वाळल्यानंतरच दुसरा कोट लावावा.

जेल मेनिक्युअर-पेडिक्युअर करणं आरोग्यासाठी घातक, कॅन्सरचा धोका, तज्ज्ञ सांगतात...

 

टॅग्स :ब्यूटी टिप्स